शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

दोन हजार विद्यार्थ्यांना अकरावीची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:48 IST

नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, एकूण २९३५ विद्यार्थ्यांची नावे अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली आहेत. सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.

नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, एकूण २९३५ विद्यार्थ्यांची नावे अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली आहेत. सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत आत्तापर्यंत १८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असून पाचव्या फेरीनंतर आणखी सुमारे दोन हजार विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्याची शक्यता आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांना १९ तारखेपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. नाशिक महापालिका आणि देवळाली कॅम्प कटक मंडळासाठी गेल्या १० जुलैपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे १८ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नाव निश्चित केले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील जास्तीत जास्त मुलांना पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने महाविद्यालयांमध्ये मोठे प्रवेश होण्याची शक्यता आहे.पाचव्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर झालेली नाहीत अशा विद्यार्थ्यांबाबत १९ रोजी सविस्तर सूचना जारी केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नव्हता असे सर्व विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत असून त्यांचीच पाचवी फेरी काढण्यात आली.प्रथम पसंतीचे सर्वाधिक विद्यार्थी पाचव्या फेरीत ज्यांनी अद्याप प्रवेश घेतलेलाच नाही असे पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांनादेखील स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले असण्याची शक्यता शिक्षण खात्याने वर्तविली आहे.