शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीचे बळ आणि वाघाची चाल...

By admin | Updated: September 9, 2016 02:20 IST

बैठक : कार्यक्षमतेवर शंका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना चुचकारले

श्याम बागुल  नाशिक‘असे म्हणतात, प्रशासन हा हत्ती आहे, तो आपल्या चालीने चालतो. पण हत्तीची कार्यक्षमताही तेवढीच असते. हत्ती जेव्हा मनात आणतो तेव्हा तो जेवढे वजन पेलू शकतो तेवढे वजन कोणीच पेलू शकत नाही. म्हणून आता यापुढे चाल वाघाची आणि ताकद हत्तीची जर प्रशासनाने आणली तर आपण हे परिवर्तन करू शकतो’ अशी आशादायक साद घालत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी शासकीय यंत्रणेला अकार्यक्षमतेबद्दल आडवे हात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना चुचकारले. शासकीय योजनांचा खुद्द मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बसून आढावा घेण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्यापासून धाकधुकीत असलेली प्रशासन यंत्रणा जस-जशी बैठकीची घटिका समीप आली, त्या प्रमाणात धास्तावली. प्रत्यक्ष गुरुवारच्या बैठकीला सुरुवात होताच ज्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामेच सुरू झालेली नाहीत त्या तालुक्याच्या कृषी अधिकारी, तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यालाच मुख्यमंत्र्यांनी जाब विचारल्यामुळे या बैठकीचे गांभीर्य आणखीच गडद झाले. गावनिहाय व कामनिहाय आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी प्रारंभापासूनच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण बैठकीचा नूर बदलून जलयुक्त शिवार असो वा अन्य योजनांच्या अंमलबजावणीत यंत्रणेने जे काही उत्स्फूर्त सहभाग घेऊन कामे केली त्याचे कौतुक होऊ शकले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांची बैठक निव्वळ झाडाझडतीसाठीच होती, असे चित्र निर्माण झाले.प्रशासन व्यवस्थेला मंदगतीने झुलणाऱ्या हत्तीची उपमा देतानाच, त्याच्यातील कार्यक्षमतेलाही हत्ती एवढे बळ असल्याचे सांगून चुचकारले. बदली- बढतीचा गोंधळ व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले पाहता, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वाघाची चाल चालण्याचा सल्ला दिला. अर्थात एकीकडे हे करीत असताना विभागातील पालकमंत्र्यांनी यापुढे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा सातत्याने आढावा घेण्याच्या सूचना करून शासकीय यंत्रणा हाताबाहेर जाणार नाही याची तजवीजही करून ठेवली. थोडक्यात, गुरुवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची जशी जवळून मानसिकता चाचपडण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रकारे अधिकाऱ्यांनीही सरकारची प्राथमिकता नेमकी काय हे ओळखून घेतली. प्रशासनातील अधिकाऱ्यांशिवाय सरकार काहीच करू शकत नाही हे हेरून असलेल्या मुख्यमंत्र्यांना सरते शेवटी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची घोषणाही करावी लागली, यातच सारे काही आले.