शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निकवेल परिसरातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित

By admin | Updated: December 27, 2015 23:23 IST

निकवेल परिसरातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित

निकवेल : बागलाण पश्चिम पट्ट्यातील निकवेलसह परिसरातील दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणा ह्या गावांमध्ये तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे रविवारी २७ रोजी डांगसौदाणे विद्युतपुरवठा कार्यालयावर शेतकऱ्यांनी, कर्मचाऱ्यांना घेराव घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. संबधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. निकवेलसह परिसरात दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणा आदि गावांना विद्युतपुरवठा कंपनीचे डांगसौंदाणा येथुन विद्युतपुरवठा होत असतो; मात्र डांगसौदाणे सबस्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत जवळ जवळ ४८ तास वीजपुरवठा खंडित आहे. या कालावधीमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत झाला का नाही याची खात्री करण्यासाठी १ ते २ तास वीजपुरवठा देण्यात आला; त्यानंतर परत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजपुरवठा सुरळीत नसल्याने लागवड झालेल्या कांद्याला पाणी मिळाले नसल्याने कांदा लागवडही वाया जाणार आहे. काल सकाळी ११ वाजता निकवेल येथील शेतकऱ्यांनी थेट विद्युत वितरण कंपनीचे डांगसौंदाणा येथील कार्यालयामध्ये जाऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी निकवेल परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा नाही. सध्या कांदा लागवड सुरू आहे. लागवड झाल्यावर पाणी लागते, मात्र पाण्याला वीजपुरवठाच नाही तर पाणी शेतीला कसे देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी कार्यालयाचे उपयंत्रचालक एस. के. आहिरे यांनी शेतकऱ्यांना समजूतदारपणे सांगण्यात आले की, आम्ही मान्य करतो की, गेल्या शुक्रवारपासून तुमच्या गावाचा विद्युतपुरवठा बंद आहे. आज ४ वाजेपर्यंत तुमच्या गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.त्यानंतर डांगसौदाणा येथील तुळजाभवानी एज्युकेशनचे चेअरमन संजय सोनवणे यांनी तहसीलदार पोतदार यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सध्या निकवेल परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र गेल्या तीन दिवसंपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. विद्युतपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, भिका वाघ, नीलेश वाघ, रमेश वाघ, अभि महाजन, कृष्णा वाघ, गोकुळ वाघ, केवल सोनवणे, नाताजी वाघ, चिंतामण वाघ आदि शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)