शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

औष्णिक केंद्रातील वीज निर्मितीही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:34 IST

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे ...

ठळक मुद्देअवघी १६० मेगावॅट निर्मितीकोळसा तुटवड्याचा परिणाम

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असून, कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ठेवला जात आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी उपलब्ध होणाºया कोळशाच्या प्रमाणावर वीज निर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे. वास्तविक औष्णिक केंद्रांकडे सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक ठेवणे अपेक्षित असताना या केंद्रांकडे केवळ तीन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहत असून, दोन दिवसांत हा कोळसाही संपत असल्याने तिसºया दिवसाची चिंता मुख्य अभियंत्यांना असते.नाशिकमधील एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच स्टॉक मेन्टेन केला जात आहे. उपलब्ध कोळशाची मर्यादा लक्षात घेता २१० मेगावॅटच्या दोन संचांमधून एकूण १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण केली जात आहे. तिसरा २१० मेगावॅटचा संच सध्या वार्षिक देखभाल दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॅटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. संच चालविण्यासाठी प्रतिदिन कोळशाची मागणी नोंदविली जाते, परंतु मुख्य कार्यालयाकडून कोणतीही हमी दिली जात नसल्याने असलेल्या कोळशाचा मर्यादित वापर करून वीज निर्मिती करावी लागत आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, दोन्ही संच प्रत्येकी २१० मेगावॅट निर्मिती करतात. पुरेसा कोळसा मिळाला तर आणखी काही मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल प्रसंगी २१० चे दोन्ही संच पूर्ण क्षमतेचे चालविलेही जाऊ शकतात. मात्र कोळशामुळे दोन्ही संच मिळून केवळ १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण करीत आहेत.