शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी पिके करपू लागली

By admin | Updated: September 13, 2016 01:06 IST

विजेअभावी पिके करपू लागली

 लोहोणेर : दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्याच्या पूर्व भागाला वाढीव चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातून विहिरींना थोडेफार पाणी आले असले तरी वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. येथील काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली; मात्र विजेअभावी पाणी भरता न आल्याने हे संपूर्ण पीक उन्हाने वाळून गेले आहे. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीजवितरण विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेतकरतयांनी दिला आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खुंटेवाडी, वाखारवाडी, पिंपळगाव, विजयनगर, वाखारी, खडकतळ, खालप आदी गावांच्या शिवारातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे ज्या काही शेतकर्यांच्या विहिरीला पाणी उतरले आहे , त्यांचा या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे, तर काही शेतकरी कांदा लागवड करत असल्याने या कांदालागवडीस पाणी देण्यासाठी विजेच्या प्रतीक्षेत असतात. मात्र दिवस-रात्र थांबूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देण्यास मर्यादा पडत आहेत.खुंटेवाडी ता. देवळा येथील हनुमानमळ्यात केलेल्या कांदा लागवडीस विजेअभावी पाणी देता न आल्याने सर्वच कांदा लागवड उन्हाने करपून गेली आहे. कधी नव्हे ते विहिरींना थोडेफार पाणी आले तेही पिकांना देता येत नसल्याने शेतकरी वर्ग हवालिदल झाला आहे. (वार्ताहर)