लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : शहर व परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. तळेगाव रोही येथे वीज पडून एक बैल व कानमंडाळे येथे दोन गायी मृत झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी दिली. चांदवड शहरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यात मर्चण्ट बॅँक कॉलनी येथे वीज वितरणचा खांब कोसळ्याने वीजपुरवठा बंद झाला. चांदवड- मनमाड रोडवरील जय जवान हॉटेलसमोर वडाचे झाड कोसळून वाहतूक कोंडी झाली होती. तळेगाव रोही येथील कौतिक बाबूराव ठोेंबरे या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पडून त्याचा मालकीचा बैल मृत्यू पावला, तर कानमंडाळे येथील परशराम कोंडाजी पवार यांच्या शेतातील दोन गायी वीज पडून मृत झाल्या. तसेच हिरापूर येथे आत्माराम निवृत्ती आढाव यांच्या मालकीची एक गाय, वाहेगावसाळ येथील माधव रेवजी मंडलिक यांच्या मालकीच्या एका वासराला मृत्यू झाला. तसेच पिंपळद येथील रंगनाथ गोंविद माळी यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले.
चांदवड तालुक्यात वीज पडून बैल ठार
By admin | Updated: June 5, 2017 00:31 IST