शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लोंबकळतात विद्युत तारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 00:45 IST

इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी ठरु पाहत आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : शॉर्टसर्किट होऊन दूर्घटनेची शक्यता : रुग्णांच्या जीवाशी खेळ

इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी ठरु पाहत आहे.इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो. तालुक्यातील नागरिक येथे उपचारासाठी, लसीकरण करण्यासाठी येत असतात. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच विद्युत वाहिनींच्या जीर्ण झालेल्या तारा एकमेकांत गुंतलेल्या असून, काही तारा लोंबकळत आहेत. जमिनीपासून ६ ते ७ फूट अंतरावर या तारा आल्या आहेत. त्यांच्या खालीच पिण्याच्या पाण्याचा स्टीलचा वॉटर फिल्टर असून, बाजूला औषधांचा कक्ष आहे. समोरच रुग्ण तपासणी व विविध प्रकारच्या तपासण्या करण्याची लॅब आहे. या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल? असा प्रश्न केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून याठिकाणी नवीन तारा बसवून त्यांची कन्सिल्ड फिटिंग करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघतोय की काय? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन तत्काळ नवीन वायरिंगचे काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर नवीन वायरिंगचे कन्सिल्ड फिटिंग केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. याला संबंधित विभाग जबाबदार राहील, कारण आम्ही रुग्णांच्या जीवाशी कोणताही खेळ होऊ देणार नाही.- सुमित बोधक, शहराध्यक्ष, मनसे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलGovernmentसरकार