शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:46 IST

विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’ नाशिक : वीजनिर्मितीचा तुटवडा झाल्यामुळे महावितरणक डून अचानकपणे मंगळवारी (दि.१२) संपूर्ण राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करण्यात आले. याअंतर्गत शहरामधील विविध भागांमध्ये दुपारी-संध्याकाळी ‘बत्ती गुल’ झाली होती. शहराचे वातावरणात उष्मा वाढलेला असताना झालेल्या भारनियमनामुळे नागरिकांना त्याचा अधिक प्रभाव जाणवला.

विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’

नाशिक : वीजनिर्मितीचा तुटवडा झाल्यामुळे महावितरणक डून अचानकपणे मंगळवारी (दि.१२) संपूर्ण राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करण्यात आले. याअंतर्गत शहरामधील विविध भागांमध्ये दुपारी-संध्याकाळी ‘बत्ती गुल’ झाली होती. शहराचे वातावरणात उष्मा वाढलेला असताना झालेल्या भारनियमनामुळे नागरिकांना त्याचा अधिक प्रभाव जाणवला.राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धता व पुरवठ्यामध्ये आलेल्या अडचणींमुळे वीजनिर्मितीचा तुटवडा निर्माण झाल्याचे महावितरणकडून भारनियमनामागील कारण सांगण्यात आले. या कारणास्तव संपूर्ण राज्यात मंगळवारी भारनियमन दुपारी तीन तास व संध्याकाळी तीन तास या वेळेनुसार करण्यात आले. सदरचे भारनियमन कमी वसुली व जास्त वीजहानी असलेल्या ई-एफ-जी गटांमधील वीजवाहिन्यांवर गरजेनुसार केले गेले.शहरातील इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, अशोका मार्ग, साईनाथनगर, उपनगर, गांधीनगर या भागांत भारनियमन सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि दुपारी साडेतीन ते साडेसहा या वेळेत भारनियमन करण्यात आले.शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. मध्यंतरी कडक ऊन पडत असतानाच आता पुन्हा पावसाची हजेरी होऊ लागल्याने वातावरणात उष्णता जाणवत आहे. अशा स्थितीत भारनियमन अडचणीचे ठरणार आहे.शहरातील भारनियमन परिसर शहर विभाग १ मधील कालिका माता मंदिर, गडकरी चौक, रविवार कारंजा, प्रकाश पेट्रोल पंप, गंजमाळ, एनडी पटेल रोड, लेखा नगर, ठक्कर बाजार, गोविंद नगर, मोरे वाडी, पंचवटीतील कृष्णा नगर, कला नगर, सारडा सर्कल, जुने नाशिक, फाळके रोड, भद्रकाली, दहीपुल परिसर व शहर विभाग २ मधील इंदिरानगर, कल्पतरू नगर, चुंचाळे घरकुल, सावरगांव, एकता नगर, नाशिकरोड गोरेवाडी, जाधव संकुल, मखमलाबाद, अश्वमेध नगर, पाथर्डी, सातपुर, दिपाली नगर, जेलरोड पंचक, हनुमान नगर, शिवाजी वाडी या भागामध्ये मंगळवारपासून आपत्कालीन व तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. वीज निर्मिती सुरळीत होईपर्यंत भारनियमन केले जाणार आहे.