शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जुन्या नाशकात विजेचा लपंडाव

By admin | Updated: June 16, 2014 00:21 IST

राष्ट्रवादीचे निवेदन : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

 

नाशिक : जुन्या नाशकातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अचानकपणे खंडित होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सानुले यांना निवेदन देण्यात आले असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जुन्या नाशकातील बरीचशी घरे जुनी व कच्च्या वीट-मातीची आहेत. यातील बहुतांश घरांचे छत पत्र्याचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वीज नसल्याने पंखाही लावता येत नसून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पंख्याअभावी लहान मुलांनाही त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडासा जरी पाऊस पडला तरी वीजपुरवठा खंडित होतो. यासाठी वीज कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी नगरसेवक रंजना पवार, नाना पवार, मिलिंद रिकामे, रामा गायकवाड, भूषण शिरसाठ, धर्मराज काथवटे, सीमा सोपे, सोनी परदेशी, ओमकार बेदरकर, विकी जगताप, अमोल कुमावत आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)