याप्रकरणी तीनही संशयित बाळासाहेब रंगनाथ शेळके, रा. काळखोडे, विकास उर्फ शेखर बाळासाहेब ठाकरे, ऋतिक वसंत ठाकरे दोघे रा. साळसाणे यांच्याकडून तीनही पानबुडी मोटारी ताब्यात घेऊन चांदवड पोलीस स्टेशनला जमा होत्या. पोलिसांनी तिघा संशयितांना चांदवड न्यायालयात उभे केले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली, तर कोर्टाच्या आदेशान्वये तीनही मोटारी मूळमालक हिरामण सखाराम शेळके, गणेश शिवाजी शेळके, दत्तू भाऊसाहेब शेळके यांच्या सुमारे ३२ हजार पाचशे रुपये किमतीच्या मोटारी दि. १७ ऑगस्ट रोजी मोटार मालक यांना चांदवड पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी कमल अहिरे यांनी केला.
इलेक्ट्रिक मोटारी चोरट्यांकडून हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST