शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगणार; चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:27 IST

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी आयमा निवडणुकीतील तुषार चव्हाण गट सक्रिय झाला असल्याने सुरुवातीला बिनविरोध वाटणारी निवडणूक आता दोन पॅनलमध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुधवारी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी ६४ अर्ज घेतले आहेत.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी आयमा निवडणुकीतील तुषार चव्हाण गट सक्रिय झाला असल्याने सुरुवातीला बिनविरोध वाटणारी निवडणूक आता दोन पॅनलमध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुधवारी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी ६४ अर्ज घेतले आहेत.  निमाची निवडणूक बिनविरोध होण्याचे सुरु वातीला दिसत होते; मात्र निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आल्याचे सांगितले जात होते. दरम्यानच्या काळात सत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी आयमा निवडणुकीतील एकता पॅनलच्या विरोधातील तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार गटाने वेगळ्या पॅनलची निर्मिती करण्यास सुरु वात केली आहे. या पॅनलला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी एकता पॅनल आणि त्यांच्या विरोधातील पॅनलने उमेदवारी अर्ज घेतल्याने आता दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (दि. १२) अखेरचा दिवस असल्याने दोन्ही पॅनलचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. निमाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना केवळ एकच अर्ज दाखल झाला असला तरी बुधवारी ६४ अर्जांची विक्र ी झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत ८६ अर्जांची विक्र ी झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार बुधवारी एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.उद्योजकांची अग्रणी समजल्या जाणाऱ्या निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाल्यानंतर दि. १ जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्र ीस प्रारंभ करण्यात आला आहे. दि. १२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर दि. २२ जुलै उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे. तर सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिव दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यासह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, सहायक विवेक गोगटे, एन. टी. अहिरे काम पाहत आहेत.आयमा निवडणुकीचे उमटणार पडसादसत्ताधारी एकता पॅनलला शह देण्यासाठी भाजपाचे प्रदीप पेशकार, नगरसेवक शशिकांत जाधव, तुषार चव्हाण यांनी कंबर कसली आहे. किंबहुना तशी व्यूहरचना करण्यात येत आहे. आयमा निवडणुकीतील वचपा काढण्याची हीच एक संधी असल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. बºयाच दिवसांनी निमाची निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीElectionनिवडणूक