शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी

By admin | Updated: January 19, 2017 00:58 IST

दादा भुसे : युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

नाशिक : आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेची ‘ग्राउंडवर्क’ तयारी सुरू असून, युतीचा निर्णय शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे घेतील, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (दि. १८) एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केले.  हॉटेल गेट वे येथे झालेल्या एका उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांना शिवसेनेची तयारी नसल्याने ऐनवेळी पक्षाला उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी असून, याबाबत उद्धव ठाकरे अधिकृत सांगू शकतील. शिवसेनेने भाजपा सोबत युती करायची ठरवली तर ती सगळीकडेच करायला हवी, असे मत भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. एकीकडे युती करायची आणि दुसरीकडे विरोधात उभे राहून प्रचार करायचा ही भूमिका संयुक्तिक नसल्याचेही भुसे यांनी आवर्जून सांगितले.  निवडणुकांना सकारात्मक भावनेने सामोरे जाण्याकडे पक्षाचा व पक्षश्रेष्ठींचा कल असला तरी शिवसेना पक्षात इच्छुकांची संख्या वाढली असल्याने तिकीट  कोणाला द्यायचे हा प्रश्न पक्षापुढे कायम उभा आहे. काही  खासगी कारणांमुळे तूर्तास निवडणुकांसाठी पूर्ण वेळ लक्ष देता येत नसले तरी मंगळवारनंतर (दि. २४) मी निवडणूक कामात आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पूर्णवेळ लक्ष घालणार असल्याचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)