शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नियमावलीच्या घोळात रखडल्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:02 IST

नवीन विद्यापीठ कायद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या विषयीचे परिनियम राज्य शासनाने जाहीर केले आहे;

नाशिक : नवीन विद्यापीठ कायद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या विषयीचे परिनियम राज्य शासनाने जाहीर केले आहे; परंतु नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर सुरू असलेल्या घोळात महाविद्यालयीन निवडणुका अजूनही रखडल्या असून, याविरोधात विद्यार्थी संघटनांमध्ये रोष व्यक्त होत आहे.  महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने ३१ आॅक्टोबरला जाहीर केल्याने महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घोळात गेल्या वर्षी महाविद्यालयांनी निवड पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी निवडून कार्यवाहीची पूर्तता केली; मात्र यावर्षीही महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना मिळालेल्या नसल्याने अद्यापही महाविद्यालयीन निवडणुकांची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यानच्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणुका घेण्यास उशीर झालेला असल्याने काही महाविद्यालयांनी गेल्यावर्षाप्रमाणेच गुणवत्तेच्या आधारे निवडप्रक्रियेतून विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती केली असली तरी विविध विद्यार्थी संघटनांना आता लोकशाही पद्धतीने निवडणुकांचे वेध लागले आहे. दरम्यान, यावर्षी सरकारने नियमावली जाहीर करण्यास उशीर केल्याने निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी संघटनांकडून सरकारच्या शिक्षण विभागासह विद्यापीठ प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.महाविद्यालयीन निवडणुकांची नियमावलीनवीन विद्यापीठ कायदा अर्थात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक १ मार्च २०१७ रोजी लागू झाल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निर्णयात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली; मात्र या निवडणुकांविषयी स्पष्टता नसल्याने कोणत्या निकषावर निवडणुका घ्यायच्या? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने परिनियम जाहीर करीत निवडणुकांचा मार्ग केला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांनी ३० जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अनिवार्य आहे. प्राचार्य किंवा संस्थेचा संचालक हा विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी प्राधिकारी म्हणून कु लगुरुंशी चर्चा करून विद्यार्थी निवडणुकीचा कार्यक्रम तयार करतील. यात निवडणुका घेणे, अधिसूचना काढणे, प्रसिद्धी आणि निवेदने यासंबंधीचे वेळापत्रक ३० जुलैपूर्वी जाहीर करून ३० सप्टेंबरपूर्वी मतपत्रिकेद्वारे ही सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयElectionनिवडणूक