शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

स्थायी सभापतिपदासाठी आज पालिकेत निवडणूक

By admin | Updated: June 30, 2014 00:52 IST

स्थायी सभापतिपदासाठी आज पालिकेत निवडणूक

 

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील बोलणी आज दिवसभर सुरू होती. रात्री उशिरापर्यंत याबाबतची खलबते सुरू असली तरी अद्यापही या दोहोंचीही भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. इकडे शिवसेनेने सभापतिपदासाठी जोरदार तयारी केली असताना त्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक सकाळी ११ वाजता होणार आहे. सभापतिपदासाठी मनसेसह भाजपा आणि सेनेनेदेखील कंबर कसली असून, गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आणि बैठकांचा जोर वाढला आहे. या पक्षांचे नेते आणि आमदारांनीदेखील यात लक्ष घातल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढलेली आहे. मात्र अद्याप एकाही पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पालिकेत मित्रपक्ष असले तरी भाजपा आणि मनसेकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे, तर या भांडणाचा लाभ उठविण्याचा प्रयत्न सेनेकडून होऊ शकतो, अशीही चर्चा होत आहे. मात्र, यात ऐनवेळी भाजपा आणि सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपासह शिवसेनेने सभापतिपदावर दावा सांगितला आहे, तर मनसेने यंदाही सभापतिपद आपल्याकडेच राखण्याचे मनसुबे आखले आहेत. या सर्व धामधुमीत अपक्षांना सेनेची साथ लाभेल की नाही हे निव्वळ सेनेच्या भूमिकेवरच अवलंबून असणार आहे. परंतु सेनेने आपली कोणतीही भूमिका स्पष्टच केली नाही. (प्रतिनिधी)