शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही निवडणुकीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:34 IST

लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते.

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी मतदान यंत्रे तसेच व्हीव्हीपॅट मशीन्स दाखल झालेल्या असून, अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली आहेत. निवडणूक कामाची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून येथे निवडणूकपूर्व कामाला लागले आहेत.विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाºयांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची काही यंत्रे दाखल झाली आहेत. या यंत्रणांसाठी लागणाºया पूरक साहित्यांची जमवाजमवदेखील करण्यातआलेली आहे. अंबड येथे सध्या या यंत्रांसंदर्भात कर्मचाºयांना काही सूचना आणि मार्गदर्शन केले जात आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे यादीतील दुबार आणि मयत नावे शोधण्यास मोठ्या प्रमाणात यश आले आणि सुमारे ५५ हजारपेक्षा अधिक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे मतदारयादी पारदर्शक होण्यास मदत झाली असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी या मोहिमा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.मतदान जनजागृतीमतदार जनजागृती मोहिमेत सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांनाही बरोबर घेऊन जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीचा वेळोवेळी घेतलेला आढावा तसेच निवडणूक कर्मचाºयांवर सोपविलेल्या कामांचेदेखील मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विधानसभेची मोठी तयारी निवडणूक शाखेने केलेली आहे. त्यामुळे निवडणूक कधीही जाहीर झाली तरी जिल्हा निवडणूक शाखेची तयारी आघाडीवर असणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय