चांदवड : येथील व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वसाधारण आठ जागांवर उमेदवार निवडून आले. एका उमेदवाराच्या हट्टवादाने निवडणूक झाली. निवडून आलेले विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- विजय सांबर (२८९ मते), राजेंद्र लिंगायत (२८८), दीपक व्यवहारे (२८७), रमेश जाधव (२८२), शंकर गांगुर्डे (२७७),अशोक देशमुख (२७६), रामचंद्र कंकरेज (२७१), अशपाक इसाकखान (२५०) निवडून आले. अनिल जयकुमार महाजन यांना ९२ मते मिळाल्याने ते पराभूत झाले. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांत महिला राखीव गटातून अनिता व्यवहारे, भारती कापडणी, अनु. जाती-जमाती गट- पांडुरंग अंकुश जाधव, तर इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटातून किशोर व्यवहारे, भटक्या जमाती-जाती गट- भास्कर सोमवंशी आदि १३ उमेदवार निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. पी. जाधव यांनी काम पाहिले. त्यांना भास्कर वाणी व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. संस्थापक अशोक व्यवहारे, दिलीप गारे, भीकचंद व्यवहारे, चंद्रकांत व्यवहारे, लक्ष्मण लुटे, मंगेश कंकरेज, डॉ. जीवन देशमुख, किशोर क्षत्रिय आदिंसह असंख्य सभासद उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्याची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. २२ वर्षांनंतर प्रथमच बॅँकेची निवडणूक झाली. यावेळी ३६७ मतदारांपैकी ३०९ जणांनी मतदान केले होते. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव , श्रीकांत अहिरे यांनी या निवडणूक प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त ठेवला. ( वार्ताहर )
व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक
By admin | Updated: January 3, 2016 23:23 IST