पेठ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकीय यंत्रणा तयारीस लागली असून, पेठ तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप अहेर, तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या प्रशिक्षण वर्गास विनापरवानगी गैरहजर असलेल्या निवडणूक कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.समाधानकारक खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब नवले, आर. व्ही. वराडे, तज्ज्ञ मार्गदर्शक रामदास शिंदे, तालुका कृषी अधिकारी शीलानाथ पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळच्या निवडणुकीत मतदान प्रक्रि या राबवताना व्हीव्हीपॅट नवीन मशीन समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे मतदाराला मतदानाची खात्री पटणार आहे.या मशीनसंदर्भात कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष मशीन हाताळून प्रात्यक्षिकाद्वारेमशीनची कार्यप्रणाली समजून देण्यात आली.मतदारांबरोबरच कर्मचाºयांनाही या नव्या मशीनचे आकर्षण वाटले.
कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 22:54 IST
पेठ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकीय यंत्रणा तयारीस लागली असून, पेठ तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
ठळक मुद्देपेठ : प्रशासकीय तयारी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा