शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

तालुक्यातील देवळाणे, तळवाडे, बल्हेगाव, आहेरवाडी, खरवंडी, रहाडी, रेंडाळे, अनकुटे, डोंगरगाव, पिंपळखुटे बु॥ पन्हाळसाठे, धामोडे, उंदीरवाडी, नांदुर, अंगणगाव, आडगाव रेपाळ, ...

तालुक्यातील देवळाणे, तळवाडे, बल्हेगाव, आहेरवाडी, खरवंडी, रहाडी, रेंडाळे, अनकुटे, डोंगरगाव, पिंपळखुटे बु॥ पन्हाळसाठे, धामोडे, उंदीरवाडी, नांदुर, अंगणगाव, आडगाव रेपाळ, नगरसुल, विसापूर, साताळी, बाभुळगाव खुर्द, जळगाव नेऊर, आंबेगाव, वाघाळे, मुखेड, अनकाई, देशमाने बु॥ अंदरसुल, कोटमगाव खुर्द, राजापूर, नेऊरगाव, सातारे, एरंडगाव बु॥ मुरमी, महालखेडा पाटोदा, ठाणगाव, धामणगाव, गुजरखेडे, भाटगाव, सावरगाव या ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी, (दि. १२) होत आहे.

तालुक्यातील अंगुलगाव, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बोकटे, भारम, कोळगाव, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, कुसमाडी, निमगाव मढ, गणेशपुर, पिंपळगाव जलाल, कोळम बु॥ धुळगाव, कानडी, सत्यगाव, पिंप्री, पाटोदा, पुरणगाव, पिंपळगाव लेप, सोमठाण देश, देवठाण, विखरणी, सायगाव, खैरगव्हाण या २९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी, (दि. १५) होत आहे.

३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद राहणार रिक्त

येवला तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीत सरपंच पद रिक्त राहणार आहे. गणेशपुर ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत असून या ठिकाणी सदस्य रिक्त आहे. कोळगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षीत असून येथे पुरूष सदस्य निवडूण आला आहे. तर विसापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचीत जमातीमहिलेसाठी आरक्षीत असून या ठिकाणी पुरूष सदस्य निवडूण आला आहे.

येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणूकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघत आहे. पहिल्या टप्प्यात नगरसुल, मुखेड, अंदरसुल या ग्रामपंचायतींसह अंगणगाव, जळगाव नेऊर, सावरगाव तालुक्याचे लक्ष लागून असणार्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे. दुसर्‍या टप्प्यात पाटोदा या मोठ्या ग्रामपंचायतीसह बोकटे, अंगुलगाव, सायगाव या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी कोण? या बाबत उत्सुकता आहे.