शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१२ आणि १५ रोजी सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

नाशिक : जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ६१९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, येत्या १२ आणि १५ ...

नाशिक : जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ६१९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, येत्या १२ आणि १५ तारखेला सरपंचपदाचा फैसला होणार आहे. सिन्नर तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने सिन्नर तालुका वगळता उर्वरित तालुक्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी काढले आहेत. सरपंचपदाची निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने दोन टप्प्यांत निवडणूक घेतली जाणार आहे. यंदा सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने आरक्षणापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट असल्याने केवळ औपचारिकता राहिली आहे. येत्या १२ आणि १५ तारखेला होणाऱ्या निवडणुकीनंतर त्यावर शिक्कामेार्तब होणार आहे.

गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. देवळा तालुक्यातील उमराणे व येवला तालुक्यातील कातरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया लिलाव प्रकरणामुळे निवडणूक आयोगाने रद्द ठरविली. उर्वरित ६१९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यंदा सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या आठवड्यात सरपंचपदासाठी जात प्रवर्गानिहाय आरक्षण जाहिर करण्यात आले होते, तर नुकतेच महिला सरपंचपदाचे आरक्षणदेखील जाहीर करण्यात आले होते.

निवडणुकीच्या दोन दिवसांत कोणत्या तारखेला निवडणूक घ्यावयाची याबाबतचा निर्णय तहसीलदार घेणार आहेत. याबाबत त्यांना नोडल अधिकाऱ्यांनीदेखील कळविले आहे. तहसीलदारांनी कळविलेल्या तारखेनुसार ग्रामंपाचयतनिहाय निवडणुकीचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत. त्यानुसार सिन्नर तालुका वगळून नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी, निफशड, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण व देवळाया तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचदाची निवडणूक होणार आहे.

---इन्फो---

सिन्नर तालुका वगळून निवडणूक

सिन्नर तालुक्यातील मौजे दहिवडी ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी निघाले. गतवर्षी याच गटासाठी आरक्षण काढण्यात आले होते. लोकसंख्येच्या प्रमाणात सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले नसल्याचा आरेाप करीत एका सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने येत्या दि. १६ तारखेपर्यंत मौजे दहिवडी ग्रुप ग्रामंपाचयतीची निवडणूक घेऊ नयेत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सिन्नर तालुका वगळून इतर ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.