नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित एम. एस. कोठारी अकॅडमीत विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीची माहिती करून देण्यासाठी शालेय निवडणूक घेण्यात आली. शाळेतील चार हाऊसेसमधून कॅप्टन, व्हाइस कॅप्टन, हेडबॉय आणि हेडगर्ल यांच्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. प्रथमेश फडके याने सर्वाधिक मते मिळवित शाळेचा हेडबॉय होण्याचा बहुमान मिळविला, तर अनुजा डांगरीकर हिने १९१ मते मिळवत हेडगर्लचे स्थान पटकावले. आदित्य सहस्त्रबुद्धे, ब्रजेश खाडिलकर, मंदार बांगर व श्रेयस राठोड यांनी कॅप्टनपदाचा मान मिळविला. अर्चित कुलकर्णी, आयुष जेफ, राज खाके व मृगांक देशपांडे यांनी व्हाइस कॅप्टनपदाची शपथ घेतली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक घेण्यात आली. याचवेळी लोकशाही व निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. शाळेच्या समन्वयक सौ. रेणू कोरडे यांच्या हस्ते निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)