शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार उद्या उपनगराध्यक्ष पदाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:37 IST

सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी (दि.29) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे.

ठळक मुद्देसिन्नर: पंकज मोरे, प्रणाली गोळेसर यांच्या नावाची चर्चा

सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी (दि.29) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे.सिन्नर नगरपरिषदेवर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एकहाती सत्ता असून उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड होईल असे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे या पदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी नगरसेवक पंकज मोरे व नगरसेवक प्रणाली भाटजिरे-गोळेसर यांची नावे अग्रभागी असल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी 24 मार्च रोजी पदाचा राजीमाना दिला आहे. तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासन अधिकारी भा. व. गोसावी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार्‍या या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी संंबधित उमेदवार अथवा सूचक, अनुमोदक उमेदवारी अर्ज पिठासन अधिकार्‍यांकडे प्रत्यक्ष दाखल करतील. अन्य सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला हजेरी लावतील अशी माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.दरम्यान, बुधवारी सकाळी 10 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी, माघार आणि निकाल असा कार्यक्रम पार पडणार आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत