शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदासाठी १४ रोजी निवडणूक

By admin | Updated: March 7, 2017 23:31 IST

येवला : नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका मंगळवारी (दि. १४) होत आहेत.

येवला : नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका मंगळवारी (दि. १४) होत आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यासंबंधीचे आदेश पारित केले आहेत.  संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या पंचायत समित्यांच्या सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.येवला तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी येवल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते १ पर्यंत सभापती आणि उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दुपारी १ वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे.  येवला पंचायत समितीत शिवसेनेचे सात आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेचा सभापती आणि उपसभापती होणार असल्याचे स्पष्ट आहे.  सभापतिपद इतर मागासवर्ग महिला राखीव असल्याने सेनेच्या अंदरसूल गणातील नम्रता जगताप आणि सावरगाव गणातून निवडून आलेल्या आशाबाई साळवे यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. अडीच वर्षांत दोघांनाही सव्वा सव्वा वर्षाचे सत्तेचे वाटे करायचे हादेखील पर्याय खुला आहे.  राष्ट्रवादीला पंचायत समितीत मविप्र संचालक अंबादास बनकर यांनी एकहाती किमान तीन जागा मिळवत तारले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणात सेना-भाजपाची युती तुटली, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची आघाडी बिघडली.  सेनेने सत्तास्थाने ताब्यात घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाला सणसणीत चपराक बसली आहे. सेनेने सत्ता काबीज केली पण आता मात्र विकासाचे आव्हान पेलावे लागणार आहे. (वार्ताहर)