शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक नसलेल्या गावाला निवडणूक अधिकारी नेमले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:05 IST

नांदगाव : जेवढी छोटी निवडणूक तेवढी धामधूम अधिक असते. दररोज आरोप-प्रत्यारोपांचे आपटबार फुटणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने निवडणूक ...

ठळक मुद्देअबब ! हे काय केले..: नांदगाव तालुक्यातील जामदरी गावाची कथा

नांदगाव : जेवढी छोटी निवडणूक तेवढी धामधूम अधिक असते. दररोज आरोप-प्रत्यारोपांचे आपटबार फुटणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने निवडणूक यंत्रणेला अत्यंत सावधानतेने रहावे लागते. परंतु निवडणूक होणारच नाही त्या गावात सहायक निवडणूक अधिकारी यांची नेमणूक केली गेली असेल तर याला प्रशासकीय फटाका म्हणावे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.निवडणुकीत शासकीय अधिकारी असो की कर्मचारी, एकदा नेमणुकीचे आदेश दिले की, कारण न सांगता कामावर हजर रहावे लागते. आदेश पाळला नाही तर मोठ्या कारवाईची शक्यता असते. परंतु निवडणूकच नाही.... आणि निवडणुकीच्या जबाबदारीचे आदेश वरिष्ठांनी दिले तर दोषी कोणाला धरायचे? हा संशोधनाचा विषय असला तरी, या आदेशामुळे महसूल यंत्रणेच्या एकंदरीत कामकाज पद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.नांदगाव तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असताना, निवडणूक असलेल्या गावांचे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांना नियुक्तीचे पत्र तहसीलदारांनी दिले. त्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले. अपवाद झाला फक्त जामदरी या गावाचा. तिथे ग्रामसेवकाची नेमणूक झाली खरी. पण ज्या गावाला निवडणूकच नाही, तिथे काय काम करायचे? असा प्रश्न पडला तर वावगे ठरू नये. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येईपर्यंत आदेशाचा कागद व्हायरल झाला होता. त्यामुळे आता प्रशासन सारवासारव करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत....याला काय म्हणायचे?प्रशासनातील भोंगळ कारभार हा नेहमीच संतापाचा तसाच तो मनोरंजनाचाही विषय बनत असतो. आधीच निवडणुकीसाठी ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केल्याने ग्रामसेवक संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. त्यात प्रशासनाच्या या चुकांमुळे मनस्ताप सहन करण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनातील कार्यपद्धतीचा हा नमुना तालु्क्यात करमणुकीचा विषय झाला आहे. ही बाब नजरचुकीने अथवा अनावधनाने झाली की मुळातच प्रशासनाचा बुद्धीचा कस येथे कमी पडला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक