शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक : कॉँग्रेस-राष्ट्रवादी ‘आघाडी’चे संकेत

By admin | Updated: October 5, 2016 01:16 IST

विरोधाच्या तलवारी म्यान

नाशिक : राज्यातील आणि देशातील सत्ता गेल्यानंतर या अपयशाचे खापर एक-दुसऱ्यावर फोडणाऱ्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीला स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा दिला खरा; परंतु आता मात्र एकमेकांशिवाय निवडणुका लढविणे सोपे नाही, हे उभय पक्षांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आघाडीचे संकेत मिळाले आहेत.दोन दिवसांपूर्वीच नाशिकला आलेले कॉँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी कॉँग्रेस कार्यकर्ते नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अनेकांनी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही मध्यंतरी अशीच बैठक घेतली तेव्हा कॉँग्रेसशी युती करण्याची इच्छा प्रदर्शित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचीही आघाडीची तयारी असल्याचे नूतन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत पटत नाही. निवडणुका जवळ येताच स्वबळाच्या भाषा सुरू होतात. यंदाही तसेच घडले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वीच बैठका घेतल्या तेव्हा राष्ट्रवादीविषयी तक्रारी करण्यात आल्या. काहींनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचे किंवा नाही याचा स्थानिक स्तरावरच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करताना श्रेष्ठींकडून आघाडी लादली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.