शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक मोबाइल व्हॅन पोहोचणार मतदारांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:27 IST

मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.

नाशिक : मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नावे वगळणे आणि नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहने करूनही राहिलेल्या मतदारांपर्यंत आता निवडणूक शाखाच पोहोचणार आहे. यासाठी ‘नाम मे क्या रखा हैं’ असे घोषवाक्य असलेली व्हॅन मतदारांपर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नावे वगळणे आणि नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहने करूनही राहिलेल्या मतदारांपर्यंत आता निवडणूक शाखाच पोहोचणार आहे. यासाठी ‘नाम मे क्या रखा हैं’ असे घोषवाक्य असलेली व्हॅन मतदारांपर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. शहर परिसरात मंगळवार (दि.२३) पासून सदर मोहिमेला सुरुवातदेखील झाली आहे.नाशिक सिटीझन फोरम या संस्थेबरोबर झालेल्या बैठकीत मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी करावयाच्या उपाय-योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी बहुतांश मतदारांना त्यांच्या नावातील बदल अथवा मतदार यादीतील अन्य दुरुस्तांसाठी कार्यालयात येण्यासाठी वेळ होत नसल्याने त्या दुरुस्त्या तशाच राहून जातात, असे सर्वसाधारण मत व्यक्त झाले. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याची काही व्यवस्था करता येईल काय यावर चर्चा झाली. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने काही मोबाइल व्हॅन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यालयीन वेळेनंतर फिरवल्यास व त्या मोबाइल व्हॅनद्वारे मतदारांकडून अर्ज स्वीकारले गेल्यास मतदारांना मतदार यादीतील दुरुस्तीबाबत अर्ज सादर करणे सोपे होणार आहे. दि.२३ पासून शहरातील चार शहरी विधानसभा मतदारसंघ आणि मालेगाव शहर या मतदारसंघांमध्ये निवडणूक शाखेकडून नाम में क्या रखा हैं या वाहनाद्वारे मतदार आणि नागरिकांमध्ये मतदार यादीसंदर्भात जागृती केली जात आहे.निर्दोष आणि परिपूर्ण मतदार याद्या यशस्वी निवडणूक संचलनाचा पाया असल्यामुळे मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि मतदारांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबातील तसेच परिचयातील कुटुंबातील व्यक्ती मृत्यू झालेली असेल, तर अशा मयत व्यक्तीच्या नावांची मतदार यादीमधून वगळणी करावी आणि मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण बनविण्याच्या नाशिक जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या मोहीमेस सर्व सहकार्य करावे.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक