शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हुरडा पार्ट्यांतून साधला जातोय निवडणूक प्रचार

By admin | Updated: January 31, 2017 00:19 IST

समर्थकांच्या सहली : मतदारांना भुरळ घालण्यासाठी विविध क्लृप्त्या; खर्च लपविण्याचा खटाटोप

नाशिक : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी निवडणूक आयोगाने पाच लाख रुपये खर्च करण्याचे निर्बंध घातल्यामुळे विविध इच्छुकांकडून निवडणूक खर्च लपविण्याचा खटाटोप सुरू असतो. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वीच मतदारांना भुरळ घालण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात असून, शहराबाहेरच्या शेतमळ्यात हुरडा पार्ट्यांचे आयोजन करून त्यातून निवडणूक प्रचार साधला जात आहे.  महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुकांना केंद्र सरकारने लादलेला नोटाबंदीचा निर्णय तसेच निवडणूक आयोगाची निवडणूक खर्चाची मर्यादा यामुळे प्रचाराचे नियोजन करताना विविध समस्या येत असून, मतदारांना थेट प्रलोभन देऊन आपल्या बाजूला वळविणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांनी नोटाबंदी आणि निवडणूक खर्चाच्या कात्रीतून बचावासाठी प्रभागातील समर्थकांना व त्यांच्या नातेवाइकांना आमंत्रित करून शहराबाहेरच्या शेतमळ्यात हुरडा पार्ट्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या प्रभागातून इच्छुक अपक्षांचाही समावेश आहे. महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेकांचे शहराबाहेर फार्महाऊस तथा शेतमळे आहेत. अशा ठिकाणी हुरडा पार्ट्या आयोजित करून खर्चात बचत करतानाच निवडणूक खर्च मर्यादेतून सुटण्याचीही पळवाट शोधली जात आहे. तर काही इच्छुकांकडून कृषिपर्यटन केंद्रांमध्येही गटागटाने हुरडा पार्ट्यांचे बुकिंग करून अशाठिकाणी इच्छुकांचे प्रतिनिधी तथा समर्थक मतदारांना संबंधित इच्छुकांविषयी गोडवे गात मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा प्रकार गोपनीय पद्धतीने आणि नियोजनबद्ध रीतीने होत असल्याने या खरोखर हुरडा पार्ट्या आहेत की निवडणूक प्रचार याविषयी प्रशासनासह विरोधकही नेहमीच अनभिज्ञ राहिल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)समर्थकांकडून नियोजनहुरडा पार्टीसाठी प्रभागातील नागरिकांना जमविणारे बहुतेक इच्छुकांचे समर्थकच असतात. असे समर्थक त्यांची मित्रमंडळी आणि नातेवाइकांना एकत्र करून त्यांच्यासोबत या हुरडा पार्टीच्या निमित्ताने संवाद साधतात. अनेकदा इच्छुक उमेदवारही अल्पावधीसाठी का होईना, अशा पार्टीला भेट देतात. त्यामुळे त्यांना एकाचवेळी किमान ५० मतदारांपासून तीनशे, चारशे मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य होते. शिवाय असा खर्च निवडणूक आयोगाला सादर करण्यासाठीही पळवाट शोधता येत असल्याने अशाप्रकारे एकत्रिक कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून होत आहे.