शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या पाठीमागे लागणार निवडणूक कॅमेरे

By admin | Updated: January 18, 2017 00:52 IST

आचारसंहितेच्या तक्रारी : मुनगंट्टीवार प्रकरण मुंबईकडे

नाशिक : वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी शिक्षकांना विम्याचे कवच शक्य असल्याचे केलेली घोषणा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आचारसंहितेनंतर शिक्षक भरती करण्याचे दिलेले आश्वासन व त्यामुळे दाखल होत असलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी पाहता आता सरकारमधील मंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष, सदस्यांच्या पाठीमागे आता निवडणूक कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जिल्ह्णात सध्या पदवीधर निवडणूक तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जारी असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जावे यासाठी शासकीय पातळीवर पूरेपूर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राजकीय पक्षांचे फलक, निवडणूक चिन्हे, आमदार व खासदारांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचे फलक झाकण्यात आले आहेत. राजकीय पक्षांचे ध्वजही काढून टाकण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पुढारी, मंत्र्यांनाही मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. असे असताना वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी शिक्षकांना विम्याचे कवच देणे शक्य असल्याची घोेषणा मुंबई येथे केल्यावर त्या संदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीतच सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता सुरू असून, या मतदारसंघात मतदार म्हणून शिक्षकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठीच मुनगंट्टीवार यांनी घोषणा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने जिल्हा आचारसंहिता कक्षाने या तक्रारीची खातरजमा केली असता, मुंबईच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा प्रशासनाने सदरची तक्रार अधिक चौकशीसाठी बृहन्मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधातही दाखल झालेल्या तक्रारीची प्रशासनाने नाशिकचे प्रांत व तहसीलदारांमार्फत तसेच महापालिका आयुक्तांकडून माहिती मागविली असता, ज्या कामांचे आमदार सानप यांनी लोकार्पण केले ते काम कोणत्याही शासकीय अनुदानातून वा विकास निधीतून केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही तक्रार निकाली काढण्यात आली आहे. सोमवारी नाशिक भेटीवर आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संस्था चालकांच्या बैठकीत निवडणूक आचारसंहितेनंतर शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिल्याने त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने प्रशासनाने राजशिष्टाचार केलेला नसला तरी, त्यांच्या दौऱ्यात संस्थाचालकांच्या बैठकीचा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर तावडे यांनी संस्थाचालकांना आश्वासन दिले असल्यास त्याबाबत माहिती जात आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांचे नेते, मंत्री शहरात दाखल होतील हे पाहता, यापुढे प्रचारासाठी येणाऱ्या नेते, मंत्र्यांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाचा कॅमेरा ठेवण्यात येणार आहे. बुधवारी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यावरही आता लक्ष ठेवण्यात येणार आहे.