शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक : भाजपाचे वर्चस्व

By admin | Updated: July 13, 2017 00:37 IST

२४ जुलैला विषय समित्या सभापती; निवडणूक कार्यक्रम जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सदस्यांच्या नियुक्त्या होऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर महापालिकेच्या विधी, आरोग्य-वैद्यकीय आणि शहर सुधार या तीन विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी घोषित केला आहे. सोमवार, दि. २४ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, अपर आयुक्त जोतिबा पाटील यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तीनही समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असल्याने भाजपाचेच सभापती विराजमान होणार आहेत. महापालिकेत नव्याने तीन विषय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. दि. २६ मे रोजी झालेल्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या घोषित केल्या होत्या. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम लागला आहे. वैद्यकीय व आरोग्य समितीवर भाजपाचे सतीश कुलकर्णी, अंबादास पगारे, रुपाली निकुळे, शांता हिरे, छाया देवांग, शिवसेनेच्या किरण गामणे, हर्षदा गायकर, रंजना बोराडे आणि मनसेचे योगेश शेवरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहर सुधार समितीवर भाजपाचे स्वाती भामरे, पंडित आवारे, रुची कुंभारकर, भगवान दोंदे, सुदाम नागरे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले आणि मनसेच्या सुरेखा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे मनसेला बक्षिसी शक्यतीनही समित्यांवर बहुमत असल्याने भाजपाचेच उमेदवार सभापती-उपसभापतिपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातपूर प्रभाग निवडीप्रसंगी मनसेने भाजपाला साथ दिल्याने एखाद्या समितीचे सभापती अथवा उपसभापतिपद मनसेच्या पारड्यात टाकले जाण्याची शक्यता आहे.