शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आयमा निवडणूक

By admin | Updated: May 19, 2014 01:05 IST

अध्यक्षपदी पाटील यांच्यासह सहा बिनविरोध

अध्यक्षपदी पाटील यांच्यासह सहा बिनविरोध१९ जागांसाठी २३ अर्ज दाखलसातपूर : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयीन पदाधिकार्‍यांच्या सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी विवेक पाटील यांच्यासह सहाही पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उर्वरित कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागांसाठी २३ अर्ज दाखल झाले आहेत.आयमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यात अध्यक्ष पदासाठी विवेक पाटील, उपाध्यक्ष पदासाठी वरुण तलवार, सरचिटणीस पदासाठी विद्यमान सरचिटणीस राजेंद्र अहिरे, खजिनदार पदासाठी निखिल पांचाळ, सहसचिव पदासाठी उन्मेश कुलकर्णी व व्यंकटेश मूर्ती आदि उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कार्यालयीन पदाधिकार्‍यांच्या सहा जागांसाठी केवळ सहाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या सर्व पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागांसाठी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात विद्यमान सदस्यांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस गुरुवार असल्याने चार दिवसांत याबाबत बैठक घेण्यात येणार असून, विचारविनिमय करण्यात येईल. त्यानंतर कार्यकारिणी सदस्यांच्या १९ जागादेखील बिनविरोध होणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सत्ताधार्‍यांच्या विरोधात पॅनलची निर्मिती होऊन निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत असतानाच विरोधकांची मनधरणी करण्यात आयमाच्या माजी अध्यक्षांचे मंडळ यशस्वी ठरले आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक बिनविरोध होणार आहे. यात आयमाचे माजी अध्यक्ष विजय तलवार, ज्ञानेश्वर गोपाळे, संदीप सोनार, विद्यमान अध्यक्ष सुरेश माळी, धनंजय बेळे यांसह जवळपास सर्व माजी अध्यक्षांनी पुढाकार घेऊन आयमाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रशेखर काम पाहत आहेत.संपूर्ण निवडणूकप्रक्रिया बिनविरोध झाली असली, तरी निवडणूक कार्यक्रमानुसार आयमाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० मे रोजी होणार असून, त्यावेळी निवडणूक अधिकृत घोषित करण्यात येणार आहे. (वार्ताहर)