शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

२१ला सभापतिपदासाठी निवडणूक

By admin | Updated: October 14, 2015 22:52 IST

महिला बालकल्याण : महिनाभरानंतर लाभला मुहूर्त

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी अखेर येत्या बुधवारी (दि.२१) निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असून, प्रक्रियेला तब्बल महिनाभरानंतर मुहूर्त लागला आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची मुदत आॅगस्ट महिन्यात संपल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळामुळे नूतन सदस्यांची नियुक्तिप्रक्रिया लांबली होती. त्यानंतर महापौरांनी सप्टेंबरच्या महासभेत तौलनिक संख्याबळानुसार मनसेच्या रत्नमाला राणे, मेघा साळवे व शीतल भामरे, राष्ट्रवादीच्या रुपाली गावंड आणि शोभा आवारे, शिवसेनेच्या नंदिनी जाधव आणि रिपाइंचे सुनील वाघ, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि भाजपाच्या रंजना भानसी यांची सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर केली. सदस्यांच्या नियुक्तीनंतर महापालिकेच्या नगरसचिव विभागामार्फत लगेचच विभागीय आयुक्तांकडे सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यास विभागीय आयुक्त कार्यालयाकडून विलंब लागला. अखेर विभागीय आयुक्तांनी बुधवारी सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून बुधवार, दि. २१ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी, दि. १९ आॅक्टोबरला सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, माघारीची प्रक्रिया दि. २१ रोजीच होणार आहे. विभागीय महसूल आयुक्तालयातील उपआयुक्त रावसाहेब भागडे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)