शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:15 IST

देवळाली कॅम्प आनंद रोड नवजीवन सोसायटी येथील प्रशांत पांडुरंग डोळस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी पाच ...

देवळाली कॅम्प आनंद रोड नवजीवन सोसायटी येथील प्रशांत पांडुरंग डोळस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते आपल्या पॅशन दुचाकीने (एमएच १५ ईवाय ९९८३) आजी हिराबाई वसंत रोकडे (७०) यांना घेऊन नाशिकहून नाशिक रोडच्या दिशेने प्रवास करत होते. उपनगर नाका येथे एका मंगल कार्यालयासमोर भरधाव कारच्या(एमएच १५ एफव्ही ६५१९) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, कुठल्याही प्रकारे सांकेतिक इशारा किंवा इंडिकेटर सुरू न करता, अचानक उजव्या बाजूला भरधाव गाडी वळवली. यामुळे डोळस यांच्या दुचाकीला कारने धडक बसली आणि प्रशांत डोळस व त्यांच्या आजी हिराबाई हे दोघे रस्त्यावर कोसळले. हिराबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------

सॅनिटायझरसह विषारी औषध प्राशन करत वृद्धाची आत्महत्या

नाशिक रोड : दत्तमंदिर रोड अमेसर रेसिडन्सी येथे राहणारे दयाल ठाकूरदास अमेसर (६५) यांनी सोमवारी रात्री घरी कोणी नसताना उंदीर मारण्याचे विषारी औषध व सॅनिटायझर प्राशन करत आत्महत्या केली. दयाल अमेसर यांना तत्काळ बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आर्थिक वादातून एकास टोळक्याकडून मारहाण

नाशिक रोड: उसनवार घेतलेले दहा हजार रुपये नंतर देतो, असे सांगितल्याचा राग आल्याने युवकाला तिघा जणांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात काहीतरी हत्याराने मारून जखमी केले.

जेल रोड पवारवाडीतील भारतभूषण सोसायटीतील अमोल अशोक पगारे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोरे मळा सर्कल येथील ओळखीचा नीलेश पेखळे याच्याकडे गेला होतो. पेखळेला दहा हजार रुपये द्यायचे होते. तुझे पैसे नंतर देतो, असे सांगितले असता, त्याचा त्याला राग आला. पेखळेने शिवीगाळ करत डोक्यात हत्यार मारले. पेखळेचा मित्र मयूर बच्छाव व त्याचा जोडीदार यांनीही दंडुक्याने अमोलला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----

पेट्रोल चोराकडून कोयत्याने हल्ला

नाशिक रोड : जेल रोड रेल्वे रुळाजवळील वाघेश्वरी मंदिरामागे एक चोरटा दुचाकीमधून पेट्रोल चोरी करत असताना, त्यास एका युवकाने हटकले असता, त्याने युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे.

सामनगाव सिद्धार्थनगरला राहणारा भूषण चंद्रकांत चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पॅशन दुचाकी जेल रोड रेल्वे लाइनजवळील वाघेश्वरी मंदिरामागे उभी करून मोबाइलवर बोलत होतो. संशयित शुभम उगलेमुगले हा भूषणच्या मोटारसायकलमधून पेट्रोल काढत होता. भूषणने शुभमला गाडीतून पेट्रोल का काढतो, याची विचारणा केली असता. तो पेट्रोलची बाटली टाकून पळून गेला. काही वेळाने भूषण एका जोडीदाराला घेऊन वाघेश्वरी मंदिराजवळ येऊन शुभमच्या डोक्याच्या मागे व हाताच्या बोटावर कोयत्याने वार करून जखमी केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.