शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दांपत्य गंभीर जखमी अवस्थेत

By admin | Updated: November 27, 2015 23:47 IST

गूढ वाढले : मऱ्हळ शिवारात निर्जन वस्तीवरील घटना

सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ खुर्द शिवारात मऱ्हळ-पांगरी रस्त्यावरील निर्जन वस्तीवर राहत्या घरात वृद्ध दांपत्य गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला सदर घटना दरोडा असल्याची अफवा पसरली होती. मात्र पोलिसांना घरातून कोणत्याही वस्तूची चोरी झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी सदर प्रकार दरोड्याचा नसावा असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र गंभीर अवस्थेत वृद्ध दांपत्य आढळून आल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. मऱ्हळ-पांगरी रस्त्यावर सुमारे अर्धा किलोमीटर अंतर आतमध्ये कुटे वस्ती आहे. याठिकाणी नामदेव दगडू कुटे (७०) व सत्यभामा नामदेव कुटे (६५) हे वृद्ध दांपत्य वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा एक नातेवाईक केबल आणण्यासाठी त्यांच्या वस्तीवर गेल्यानंतर हे वृद्ध दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याने नातेवाईक व ग्रामस्थांना फोनवरून घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यानंतर घटनेची माहिती वावी पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार रामदास धुमाळ, हनुमंत कांबळे, अतुल फलके, शिवाजी माळी, एस. व्ही. शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी वृद्ध दांपत्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पांगरी व मऱ्हळ शिवारातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर प्रकार दरोड्याचा असल्याची अफवा पसरली होती. मात्र सदर वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने, कंबरेची पैशांची पिशवी व घरातील वस्तू जागेवर असल्याने सदर प्रकार दरोड्याचा नसावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र या वृद्ध दांपत्यास कोणी व का मारहाण केली असावी याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. हे दांपत्य शुद्धीवर आल्यानंतरच खरा प्रकार समोर येईल. त्यामुळे घटनेचे गूढ वाढले आहे. (वार्ताहर)