शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेत फेसाळली गोदावरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:01 IST

एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.

एकलहरे : एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.  एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला असून, त्याच्या आजूबाजूला एकलहरे, शिलापूर, ओढा या गावांचा परिसर आहे. टाकळी येथील मनपाच्या मलशुद्धीकरण केंद्रातून नदीपात्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने ते फेसाळलेले पाणी नदीपात्रातून एकलहरे बंधाºयात येते.तसेच नदीपात्रातील पाणवेली वाहून या बंधाºयापर्यंत आल्याने बंधाºयाच्या पाण्यावर सर्वत्र हिरव्यागार पाणवेलींचा थर पसरला आहे.या पाणवेलींच्या खाली असलेले पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने डासांचा उपद्रवही वाढला आहे. बंधाºयातून वाहून जाणाºया पाण्यावर एकलहरे ते ओढा गावाच्या शिवारापर्यंत नदीत सर्वत्र बर्फाप्रमाणे दिसणारा पांढºया फेसाचा थर नदीपात्रात ठिकठिकाणी साचला आहे.बंधाºयालगत तर पाण्याऐवजी फक्त फेसाचेच साम्राज्य आहे. मनपाने त्यांच्या हद्दीजवळील ग्रामीण भागाचा विचार करून या फेसाळलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली जात आहे. नदीपात्रातील फेसाळयुक्त पाण्याबाबत एकलहºयातील नागरिकांनी यापूर्वी आंदोलनदेखील केले आहे. मात्र दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नदीपात्रातून वाहून आलेल्या पाणवेली आणि फेसाळयुक्त पाणी बंधाºयामुळे एकलहºयातच अडकले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. नदीपात्रावरील टाकळीच्या मलनिस्सारण केंद्रातून अपुºया प्रक्रियेमुळे फेसाळयुक्त पाणी बाहेर पडते. हेच पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.- रामदास पाटील-डुकरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषण