शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चार दिवसात काढला आठ हजार क्युबिक मीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:08 IST

कोनांबे : जोपर्यंत गाळ तोपर्यंत उपसा; पिण्याच्या पाण्याची होणार सोय

 सिन्नर : धरणात वर्षानुवर्षे साठलेला गाळ थोड्या अवधीत काढणे शक्य नाही. धरणातून गाळ उपसा करण्याचे काम वर्षात पूर्ण होणार नाही. त्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात तीन ते चार वर्षे काम करावे लागेल. धरणात जोपर्यंत गाळ आहे तोपर्यंत उपशाचे काम सुरू ठेवले जाईल,असे आश्वासन आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिले. गेल्या चार दिवसांपासून दोन मशीनच्या साहाय्याने धरणातून गाळ उपशाचे काम सुरू आहे. सुदर्शन रिलिफ फंड, श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव व शांतीगिरीजी महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपशासाठी मदत म्हणून तिसरे मशीन उपलब्ध करून देण्यात आले. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे बोलत होते. व्यासपीठावर सुदर्शन रिलिफ फंडचे विश्वस्त सुरेश चव्हाणके, सरपंच संजय डावरे, डॉ. राजेंद्र गोऱ्हे, निवृत्ती डावरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, मोहन डावरे, भाऊसाहेब शिंदे, रामनाथ डावरे, संजय चव्हाणके, तानाजी पवार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.पावसाळा सुरू होण्यापूर्वी कमी कालावधीत जास्तीत जास्त उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याचे वाजे म्हणाले. तालुक्याच्या व पश्चिम पट्ट्याच्या दृष्टीने कोनांबे धरणातील जलसाठा खूप महत्त्वाचा आहे. गरज पडल्यास या भविष्यात या धरणातून पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे धरणात गाळ असेपर्यंत काढला जाईल, असे आमदार वाजे यांनी सांगितले. यावर्षी पाऊस सुरू होईपर्यंत धरणातून जास्तीत जास्त गाळ काढला जाईल. पुढच्या वर्षी उन्हाळ्यात कोनांबे धरणापासून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ केला जाईल. त्यामुळे सुदर्शन रिलिफ फंडाने यापुढेही मदत सुरू ठेवावी, असे आवाहन वाजे यांनी केले.जलयुक्तच्या कामांकडे नागरिकांनी चळवळ म्हणून पाहावे व श्रमदानातून कामे करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुदर्शन रिलिफ फंडाचे विश्वस्त सुरेश चव्हाणके यांनी केले. लातूर, औरंगाबाद येथे सुदर्शन रिलिफ फंडातून मदत करण्यात आली आहे. आपल्या मातृभूमीत दुष्काळाची कामे सुरू असल्याचे समजताच आपण कोनांबे येथील काम करण्यास मदत दिल्याचे चव्हाणके म्हणाले. केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन आमदार रख्मिणीबाई वाजे यांच्या प्रयत्नातून ४४ वर्षांपूर्वी कोनांबे धरण झाले होते. अशोक डावरे यांनी सांगून आभार मानले. यावेळी कोनांबे, सोनांबे, जयप्रकाशनगर व सोनारी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)