शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनप्रसंगी आठ जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 17, 2016 00:26 IST

जिल्ह्यात उत्सवावर शोककळा : लष्करी जवानाचाही समावेश

 नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनादरम्यान आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़ १५) घडल्या आहेत़ मृतांमध्ये सुटीवर आलेल्या आसाम रायफल्समधील लष्करी जवानाचाही समावेश आहे़ सिन्नर तालुक्यातील मुसळगावमधील एका साठवण बंधाऱ्यात गणपती विसर्जनासाठी गेलेला एकजण बुडत असताना पाहून लष्करी जवान संदीप सिरसाट याने पाण्यात उडी घेतली, मात्र या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने रामेश्वर शिवाजी सिरसाट (३१, कळवाडी, ता़ सिन्नर, जि़नाशिक), संदीप अण्णा सिरसाट (२५, कळवाडी, ता़सिन्नर, जि़ नाशिक) या दोघांचाही बुडून मृत्यू झाला़ साठवण बंधाऱ्यात युवक बुडाल्याची खबर पोलीसपाटील दीपक गाडेकर यांनी दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, हवालदार एन. एस. कुऱ्हाडे, तुषार मरसाळे, विनोद जाधव, तुळशीराम चौधरी, प्रवीण मरसाळे, सुशील साळवे यांनी धाव घेतली. गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी व एमआयडीसी पोलिसांनी बंधाऱ्यात शोधमोहीम राबविली. सुमारे अर्धा तासाने रामेश्वर ऊर्फ राहुलचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तासभराने संदीपचा मृतदेह सापडला. दोघांवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप हा लष्करात आसाम येथे ४४ आसाम रायफल्समध्ये कार्यरत होता, तर रामेश्वर हा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात नोकरी करतो. वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील वालदेवी फाट्याजवळील खदानीत गणेश विसर्जनासाठी गेलेला नीलेश साईनाथ पाटील (वय २५, डीजीपीनगर, नाशिक) या युवकाचा बुडून मृत्यू झाला़मालेगाव तालुक्यातील सुमित कांतीलाल पवार (वय १४, रा़ दाभाडी, ता़ मालेगाव, जि़ नाशिक) व सचिन लहू देवरे (वय १६, राख़डकी, ता़ मालेगाव, जि़ नाशिक) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ गणेश विसर्जनासाठी गेलेले या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भूषण हरी कसबे (१७, रा़ माळेगाव, ता़ त्र्यंबकेश्वर, जि़ नाशिक़) व अमोल साहेबराव पाटील (रा़पिंपळद, ता़त्र्यंबकेश्वर, जि़नाशिक)या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. योगेश्वर संकुलमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली होती. त्याच कॉलनीतील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भूषण गेला होता. गणेशमूर्ती बुडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षक यांना प्रयत्न करूनही अपयश आले. मात्र गणेशगाव येथील टीमने त्याचा मृतदेह शोधून पाण्यातून बाहेर काढला, तर गंगापूररोडवरील बेंडकुळे मळा येथे गणेश विसर्जनासाठी गेलेला रोशन रतन साळवे (बेंडकुळे मळा, गंगापूररोड, नाशिक) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़(प्रतिनिधी)