शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीचे आठ सदस्य २६ फेब्रुवारीस नेमणार अखेर ठरलं: न्यायालयाचे आदेशाचे पालनही करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:51 IST

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्त करण्यासाठी सत्तारूढ भाजपचा अखेर सुरू असलेला कायदेशीर खल संपला असून येत्या २६ फेब्रुवारीत या एक सदस्यासाठीच नव्हे तर नव्याने आठ सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्त करण्यासाठी सत्तारूढ भाजपचा अखेर सुरू असलेला कायदेशीर खल संपला असून येत्या २६ फेब्रुवारीत या एक सदस्यासाठीच नव्हे तर नव्याने आठ सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.गेल्यावर्षी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभेच्या माध्यमातून पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त करताना शिवसेनेचा एक सदस्य कमी नियुक्त केला, असा आक्षेप घेण्यात आला होता. यासंदर्भात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांची विनंती मान्य करून तसे आदेश देण्यात आले होते. मात्र, सत्तारूढ गट आणि प्रशासनाने यासंदर्भात वकिलांची मते मागविल्यानंतर दोन भिन्न मते प्राप्त झाली होती तरीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार हे उभय वकिलांचे मत झाल्याने अखेरीस महासभा घेण्याचे ठरविण्यात आले. आता १८ फेब्रुवारीला महापालिकेची नियमित महासभा होणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी २६ फेब्रुवारीस विशेष महासभा घेतली जाणार आहे.स्थायी समितीच्या आठ सदस्य नियमानुसार २८ फेब्रुवारीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानानुसार शिवसेनेचा एक सदस्य नियुक्ती करण्यासाठी स्वतंत्र महासभा न घेता एकाचवेळी आठ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. शिवसेनेच्या नव्या पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त केले जाणार आहे. त्यामुळे सेनेला एका जागेचा लाभ होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका