शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू महिना ‘रबिऊल अव्वल’चे मंगळवारी चंद्रदर्शन घडल्याने शनिवारी साजरी होणार ‘ईद-ए-मिलाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 12:57 IST

संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘१२ रबिऊल अव्वल’ला साजरा केला जातो. यानिमित्त मुस्लीम बांधव आपली घरे, दुकाने व परिसरात सजावट करतात. विद्युतर रोषणाईसह हिरवे झेंडे, पताका लावून परिसर सजविला जातो.

ठळक मुद्देउर्दू महिन्याचे चंद्रदर्शन गेल्या सोमवारी ऐवजी मंगळवारी घडले. नाशिकमधून शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मुख्य मिरवणूक हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘१२ रबिऊल अव्वल’ला साजरा केला जातो.

नाशिक : इस्लामी कालगणनेतील रबिऊल अव्वल या ऊर्दू महिन्याच्या १२ तारखेला ‘ईद-ए-मिलाद’ अर्थात पैगंबर जयंती सर्वत्र साजरी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. दिनदर्शिकेनुसार शुक्रवारी (दि.१) शासकिय सुटी पैगंबर जयंतीनिमित्त प्रसिध्द करण्यात आली असली तरी पैगंबर जयंती यावर्षी येत्या शनिवारी (दि.२) साजरी करण्याचा निर्णय नाशिक विभागीय सुन्नी सीरत मरकजी समितीसह राज्याच्या मुंबई येथील समितीनेही घेतला आहे. कारण उर्दू महिन्याचे चंद्रदर्शन गेल्या सोमवारी ऐवजी मंगळवारी घडले. त्यामुळे एक दिवस उशीरा रबिऊल अव्वल महिन्याला आरंभ झाला.संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘१२ रबिऊल अव्वल’ला साजरा केला जातो. यानिमित्त मुस्लीम बांधव आपली घरे, दुकाने व परिसरात सजावट करतात. विद्युतर रोषणाईसह हिरवे झेंडे, पताका लावून परिसर सजविला जातो. त्यामुळे मुस्लीम बहुल परिसरात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पहावयास मिळते. याबरोबरच विविध सामाजिक मंडळ व संस्थांकडून समाजप्रबोधन करणारे सामाजिक तथा धार्मिक देखावेही सादर केले जातात. तसेच विविध शहरांमधून सकाळी किंवा दुपारी ‘जुलूस’ अर्थात पैगंबर जयंतीची मिरवणूकांचे आयोजन केले जाते.

येत्या शनिवारी नाशिकमधून शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य मिरवणूक दूपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लीम बांधवांकडून घरांमध्ये खीर खाद्यपदार्थावर फातिहा पठण केले जाते. नाशिकमध्ये वडाळारोड येथे एका धार्मिक संस्थेकडून दहा दिवसीय प्रवचनमालाही सुरू करण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठेत सजावटीचे विविध धार्मिक साहित्य उपलब्ध झाले आहेत. अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या पैगंबर जयंतीमुळे तयारीला वेग आला आहे.

डीजेमुक्त मिरवणूक; डीजेवर बंदीगेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा शहरातील जुलूस डीजेमूक्त राहणार आहे. मिरवणूकीत सहभागी होणाºया मंडळांनी याबाबत खबरदारी घेऊन डीजे साऊंड सिस्टीमसह सहभाग घेऊ नये, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. डीजे घेऊन सहभागी होणाºया मंडळांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई झाल्यास संबंधित मंडळाचे पदाधिकारी त्यास जबाबदार राहतील असे आयोजक सुन्नी मरकजी सीरत समितीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लाम