शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होणे आवश्यक

By admin | Updated: February 19, 2017 00:08 IST

‘लोकमत’ला भेट : हनुमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली अपेक्षा

नाशिक : शहरांमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या ग्रामीण तरुणांसमोर प्लंबिग, हाउसकिपिंग यांसारखी कामे करताना मानसन्मानाचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय अशाप्रकारे रोजगार मिळवूनही आयुष्यभर ‘मरण येत नाही, म्हणून जगत राहावे’ अशा स्थितीत अनेकांना संपूर्ण आयुष्य घालवावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील संसाधनांचा योग्य वापर करून तरुणांसाठी सन्मानजनक रोजगार निर्मिती होण्याची आवश्यकता आहे, असे मत भारत विकास समूहाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केले.  ‘संवाद २०१७’ कार्यक्रमात नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथे आले असताना गायकवाड यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी लोकमत चमूशी संवाद साधताना गायकवाड यांनी यशस्वी जीवनप्रवासातील विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. ते म्हणाले, आजपर्यंतच्या प्रवासात कधीही खोटे बोललो नाही. कोणाशीही स्पर्धा केली नाही. जे काम केले, ते चांगले केले. त्यामुळेच जे काम हाती घेतले त्यात यश प्राप्त झाले आणि भारत विकास प्रतिष्ठानचा व्याप वाढत गेला. या प्रवासात सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने कामात प्रगती साधता आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.  या चर्चेत ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, फिचर एडिटर अपर्णा वेलनकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख सहभागी झाले होते. यावेळी गायकवाड यांच्या समवेत विजय हाके, जयदीप  निकम, बाळासाहेब कंकराळे, सुनील ठाकरे, श्रीकांत आंबरे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)बुकलेट अ‍ॅप हनुमंतराव गायकवाड यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या सहकारी व कुटुंबीयांना दिले. सहकारी समूहात काम करताना ते स्वत:चे आहे, असे समजून काम करतात, असे ते म्हणाले. सहकाऱ्याच्या कामाचे उदाहरण देताना बीव्हीजीच्या बूकलेट अ‍ॅपची ओळख करून दिली. समूहातील सनदी लेखापाल अमृत देशमुख यांनी हे अ‍ॅप तयार केले असून, या अ‍ॅपमध्ये कृषीसह विविध विषयांवरील पाचशे पुस्तकांचा लिखित व कथन स्वरूपातील सारांशाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी देशमुख यांनी एक पुस्तक तीनवेळा वाचून त्यातील विविध विषय सारांश रूपात मांडला आहे. त्यामुळे ज्यांना वाचन शक्य नाही अशा व्यक्तींसाठी हे अ‍ॅप मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.