शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा ताठेंना, अभय पांडेंना!

By admin | Updated: February 9, 2017 15:41 IST

शिवसेनेच्या कारवाईबाबत आश्चर्य

नाशिक : महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने आपली उमेदवारी कायम ठेवून पक्ष आदेश डावलणाऱ्यांची संख्या डझनभर असताना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख लक्ष्मीबाई ताठे यांची पक्षातून एकीकडे हकालपट्टी करणाऱ्या सेनेच्या नेतृत्वाने दुसरीकडे महानगर प्रमुखांना थेट चोप देणाऱ्या विनायक पांडे यांना अभय देण्याची बाब सामान्य सैनिकांना खटकली आहे. ताठे यांनी महापालिकेत अपक्ष उमेदवारी केल्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली की, पांडे यांच्या कृत्यात त्याही सहभागी होत्या म्हणून कारवाई झाली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात लक्ष्मीताई ताठे यांच्या हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून, पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी ही हकालपट्टी केल्याचे वृत्तात म्हटले आहे. ताठे या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांनी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधून सेनेकडून उमेदवारी मागितली होती. तथापि, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र माघारी होण्यापूर्वीच पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताठे यांनी फक्त अपक्ष राहण्याचा निर्णय घेतल्यामुळेच पक्षाने ही कारवाई केली असेल, तर ताठे यांच्याप्रमाणे शहरात डझनभर बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध आव्हान उभे केलेले असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याने ताठे यांच्याविरुद्धच कारवाई का असा प्रश्नही विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करताना स्थानिक नेतृत्वाने घातलेल्या गोंधळातून कॉँग्रेसच्या एका नेत्याच्या हॉटेलमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना झालेल्या मारहाणीत विनायक पांडे, कल्पना पांडे यांच्याप्रमाणेच ताठे यांचाही हात असल्याची चर्चा असून, त्यातूनच पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केल्याचे बोलले जात आहे. ताठे यांची कारवाई पक्ष विरोधी नक्कीच असल्याने त्याचे समर्थन कोणी करू शकत नसले तरी, या हाणामारीत विनायक पांडे व कल्पना पांडे यांचाही हात असल्याचे जाहीर झाले आहे. त्यांच्यावर मात्र पक्षाने मेहेरबानी दाखविली आहे.