शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरस

By admin | Updated: July 2, 2015 00:32 IST

शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरस

शिक्षण समिती सभापतिपदासाठी चुरसनाशिक : महापालिका शिक्षण समिती सभापती-उपसभापतिपदासाठी येत्या शनिवारी (दि.४) निवडणूक होणार असून, गुरुवारी (दि.२) सकाळी ११ ते १ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, सभापतिपदासाठी अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांचे नाव पुढे केले जात असतानाच महाआघाडीतील कॉँग्रेसनेही त्यात उडी घेतली असून, आजवर सत्तेत वाटा न मिळाल्याबद्दल नाराजी दर्शविली आहे. शिक्षण समिती सभापती-उपसभापतिपदासाठी दि. ४ जुलैला सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. सभापती-उपसभापतिपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, नगरसचिव विभागाकडून अपक्ष गटनेते संजय चव्हाण व कॉँग्रेसच्या सदस्य वत्सला खैरे आणि योगीता अहेर यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. महापौर आणि स्थायी समिती सभापती, तसेच प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी महाआघाडी दिसून आल्याने शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही महाआघाडी कायम राहील, असे चित्र दिसत असताना महाआघाडीतील धुसफूस आता बाहेर येत आहे. पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेच्या दोन सदस्यांनी बंड केल्याने कॉँग्रेसच्या उमेदवार योगीता अहेर यांना हार पत्करावी लागली होती. सदरचा पराभव कॉँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याने शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने लढण्याची तयारी चालविली आहे. शिक्षण समितीत मनसे-५, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी ३, भाजपा व कॉँग्रेस प्रत्येकी २ आणि १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. महाआघाडीने अगोदरपासूनच अपक्ष संजय चव्हाण यांचे सभापतिपदासाठी, तर गणेश चव्हाण यांचे उपसभापतिपदासाठी नाव पुढे केलेले असल्याने याच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसने जरी महाआघाडीत न राहण्याचा निर्णय घेतला तरी मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांचे मिळून ९ संख्याबळ होते. त्यामुळे त्यांचा सभापती सहजपणे विराजमान होऊ शकतो. परंतु कॉँग्रेसने उडी घेतल्याने चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)