शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:12 IST

खामखेडा : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून शेतीमाल तयार झाल्यावर तो बाहेरील राज्यात नेण्यासाठी व्यापारी येतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

खामखेडा : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून शेतीमाल तयार झाल्यावर तो बाहेरील राज्यात नेण्यासाठी व्यापारी येतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी असायचे, तेव्हा या अल्पशा पाण्यावर मार्च किंवा एप्रिल महिन्यात उन्हाळी टमाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथींबीर आदी पिकांची लागवड केली जायची. तेव्हा ती पिके साधारण जून किंवा जुलैत बाजारात विक्रीसाठी तयार व्हायची व मालेगाव, नाशिक, धुळे, नवापूर, सुरत आदी ठिकाणी विक्रीसाठी नेली जायची.बांधावर येऊन माल खरेदी  बाहेरील व्यापारी थेट शेतकºयाचा बांधावर येऊन माल खरेदी करून रोख पैसे देऊन जायचे. त्या पैशातून शेतकºयाची मोठ्या प्रमाणात उलाढाल व्हायची व त्यातून शेतकरी खरीप हंगामातील पिकांसाठी बियाणे खत, मजुरी आदी भागवायचे.-----------------------याहीवर्षी परतीचा व अवकाळी पाऊस झाल्याने चालू वर्षी उन्हाळ्यात विहिरींना बºयापैकी पाणी होते. त्यामुळे खामखेडा परिसरातील शेतकºयांनी उन्हाळी मिरची, टमाटे, कोबी कोथींबीर आदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु दि. २२ मार्चपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी टप्याटप्याने लॉकडाऊन करावे लागले.आता खरीप हंगामातील पिकाची पेरणी झाली आहे. पिकाची कोळपणी व निंदणीही झाली आहे. पिके जोमात आहेत. त्यांना खतखाद्याची आवश्यकता आहे. परंतु यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकºयाला टमाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर आदी माल बाहेरील बाजारपेठेत विक्रीसाठी नेता आला नाही किंवा बाहेरील व्यापारी माल खरेदीसाठी शेतकरयांच्या बांधावर आले नाहीत. यामुळे शेतीमाल शेतातच विक्रीअभावी पडून राहिल. स्थानिक बाजारपेठेत मालाची आवक वाढल्याने तो कवडीमोल भावाने विकावा लागला. त्यामुळे खर्चही वसूल न झाल्याने आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक