शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भगर खा, फिट रहा !

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

नवा ट्रेण्ड : ‘गुणकारी’ पदार्थांच्या प्रचारासाठी मोहीम

संजय पाठक  नाशिकसामान्यत: उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या भगरीचा देशपातळीवर वापर केवळ दोन टक्के आहे, तोही मोजक्या राज्यात. त्या पार्श्वभूमीवर आता भगरीचा केवळ उपवास नव्हे तर पोषक अन्न म्हणून वापर करण्यासाठी भगर उत्पादक सरसावले असून, भगरीचे आरोग्यदायी गुणांचा प्रचार करीत ‘भगर खा, फिट रहा’ असा सल्ला दिला जात आहे.द्राक्ष, वाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वायनरी आहेत, परंतु त्याचबरोबर देशात सर्वाधिक भगर उत्पादक नाशिकमध्ये असून, त्याविषयी कोणाला फारशी माहिती नाही. नाशिक मुळातच आदिवासी जिल्हा असून, जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासीबहुल आहेत. साहजिक त्यांचे प्रमुख पीक असलेल्या वरईला फिनिशिंग करून भगर तयार केली जाते. नाशिकमध्ये ३५ भगर मिल असून, ९० टक्के भगर नाशिकमध्येच तयार होते. उपवासाला वापरली जाणारे हे जुने उत्पादन असले तरी जगन्नाथ-पुरीच्या यात्रेत प्रसाद म्हणून भगरीची खीर चाखणाऱ्या अनेकांना त्याचा उपवासात उपयोग होतो हे माहिती नाही. भगर म्हणजे वरईचा तांदूळ असा समज असल्याने दक्षिणेतील राज्यात भगर उपवसाला चालत नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान हे भगरीचा वापर करणारे प्रमुख राज्य त्या खालोखाल पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे भगर काही प्रमाणात वापरली जाते. अन्यत्र भगरीचा प्रचार-प्रसार झालेला नाही. आदिवासींना हक्काचे आर्थिक बळ देणाऱ्या भगरीचा उपवासाशीच संबंध जोडला जात असल्याने बहुधा भगरीपासून अन्य अनेक पदार्थ तयार करतात हे अनेकांना माहिती नाही. मात्र आता भगरीतील आरोग्यदायी गुण स्पष्ट करून त्याच्या प्रसारासाठी नाशिकची भगर असोसिएशन सरसावली आहे. भगर ग्लुटेनमुक्त असल्याने बेकरीच्या उत्पादनांसारखा ती अपायकारक नाही. तसेच त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह आणि लठ्ठपणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्यांना उपयुक्त ठरते, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. मुळात भगर ही केवळ उपवासासाठीच वापरली जाते हा गैरसमज आहे. साबुदाण्यापेक्षा कैकपटीने चांगले पदार्थ भगरीपासून तयार केले जातात. त्यात भगरीची इडली, लाह्या, उत्तपा, पॅटिस, ठेपले, ढोकळा, थालीपीठ, लाडू, खीर आणि शिरा असे अनेक पदार्थ तयार होतात. त्याचा आता देशभरात विविध माध्यमांतून प्रसार सुरू आहे, असे नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी सांगितले. ‘भगर खा, फिट’ रहा अशी चळवळ आता सुरू करण्यात आली असून, आहाराविषयी सजग असणाऱ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.