शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ननाशीत जमिनीला हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:22 IST

ननाशी : ननाशीसह परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या वेळी एका गूढ आवाजाने जमिनीला हादरे बसले़ या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ननाशी : ननाशीसह परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या वेळी एका गूढ आवाजाने जमिनीला हादरे बसले़ या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नाशिक येथील मेरीमधील भूकंपमापक यंत्रावर याबाबतची नोंद झाली असल्याची माहिती दिंडोरीचे प्रांतधिकारी डॉ़ संदीप आहेर यांनी दिली़ दिंडोरी आणि पेठ तालुक्याच्या सीमेवरील ननाशी, जोगमोडीसह परिसरात शुक्रवारी सकाळी अकरा ते सव्वाअकरा वाजेदरम्यान काही मिनिटांसाठी एक मोठा आवाज झाला. या आवाजाबरोबरच जमिनीलादेखील हादरा बसला. सकाळची वेळ असल्याने बहुतांशी नागरिक, महिला घरातच नित्याचे काम करण्यात व्यस्त होते. अचानक झालेल्या या आवाजाने आणि जमीन हादऱ्याने ग्रामस्थांमध्ये काहीशी घबराट निर्माण झाली. काही नागरिकांनी तात्काळ घराबाहेर येऊन परस्परांना हादरा जाणवला की नाही, याबाबत विचारणा केली. दरम्यान हा आवाज नेमका कसला झाला याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. केवळ ननाशीच नव्हे तर परिसरातील अनेक गावांमध्ये असा आवाज आल्याचे आणि हादरा बसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.---------------------नाशिक वेधशाळेच्या केंद्रात नोंदननाशी परिसरात झालेल्या या धक्क्याची नोंद वेधशाळेच्या नाशिक केंद्रात झाली आहे़ याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ननाशी परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी २़८ रिश्टर स्केलची नोंद झाली असून, हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे सांगण्यात आले़ सदर केंद्र नाशिक वेधशाळेपासून ४४ कि़मी़ अंतरावर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले, मात्र याबाबत शनिवारी सकाळी अन्य केंद्रांतून प्राप्त होणाºया अहवालानंतरच स्पष्टता होईल़ मागील काळात यासारखे हादरे परिसरातील काही गावांमध्ये जाणवले होते.-----------------ननाशी परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो त्यामुळे या ठिकाणी अधूनमधून असे धक्के बसत असतात़ जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे याबाबत सर्वेक्षण सुरू आहे़ नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र कच्चा घरात न राहता काळजी घ्यावी़- प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक