शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:40 IST

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : जिल्ह्यात बळीराजाची विविध कामांची लगबग

वेध शाळेपाठोपाठ निसर्गाच्या हालचालीवरून पाऊस जवळ आल्याचे संकेत मिळताच देशवंडीत सुताराच्या अंगणात शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग.

 

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.लग्नसमारंभाची धामधूम संपून उन्हाचीही तीव्रता काहीअंशी कमी होऊन हवेचे प्रमाण वाढले आहे. नायगाव खोºयात खरीपपूर्व मशागतींचे कामांची सध्या लगबग सुरू आहे. जून महिना सुरू झाला आहे. उशिरा का होईना वरुणराजाचे आगमन थोड्यााच दिवसात होणार असल्याचे भाकीत वेध शाळेबरोबर वातावरणातील बदलावरून दिसत आहे. शेतकºयांना सध्या खरीपाचे वेध लागले आहे. मशागतीचे कामे सुरू झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात नजरेस पडत आहे. सध्या लागवडीसाठी तयार झालेल्या जमिनीवर रोपवाटिका बनविण्यासाठी मेहनत सुरू आहे. यंदा पावसाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने यावर्षी शेतकरी कमी पाण्यावर व कमी खर्चात येणाºया पिकांची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार वाºयाने शेतकºयांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. जोराच्या हवेने पाऊस लवकर येईल किंवा लांबणीवर जाईल अशी दोन्ही भाकिते शेतकरी करत आहेत. त्यामुळे नक्की काय पदरात पडणार याबाबत शेतकºयांत संभ्रम आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प व शेवटच्या टप्प्यात झालेल्या कमी पावसामुळे यावर्षी प्रथमच नायगाव खोºयात तीव्र पाणीटंचाई भासली. परिसरातील विहिरी यावर्षी पहिल्यांदाच कोरड्या पडल्या आहेत.जून महिन्याच्या मध्यावर पाऊस होणार असल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठीचे बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग-मठ, उडीद आदींसह विविध बियाणे खरेदीसाठी तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगे आदी पिकांच्या रोपांची लागवडीसाठी नर्सरीत किंवा आपल्याच शेतात तयार करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.खरिपाच्या लगबगीने शेतशिवार गजबजून गेले असताना शेतीच्या मशागतीचे लाकडी नांगर, वखर, पांभर, जू आदी साहित्यांच्या डागडुजीसाठी खेडेगावातील सुतारांच्या न्याहावर शेतकºयांची गर्दी दिसू लागली आहे. गतवर्षी कमी का होईना पाऊस वेळवर सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मात्र अत्यल्प पाण्यावर पिकविलेल्या वर्षभर कोणत्याच भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. खरिपापाठोपाठ रब्बीच्या कांद्यानेही वांदा केला आहे.वातावरणातील उष्णता कमीसध्या हवामानातील बदल झपाट्याने घडत असल्याने वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. दिवसागणिक होणारे बदल पावसाचे स्पष्ट संकेत देत आहे. त्याच प्रमाणे कावळ्यांची घरटे बांधण्याची लगबग दिसत आहे. मुंग्याचीही अन्यधान्य साठवणीच्या कामाची लगबग नजरेस पडत आहे. यावरून यंदा वेधशाळेपाठोपाठ मिळत असलेले नैसर्गिक संकेत खरे ठरो आणि कष्टकरी बळीराजाला निदान पावसाचे तरी अच्छे दिन येवो.