शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दर करारावरून अडकल्या शेतकरी अनुदानाच्या योजना दर करार की ई-निविदा? - संभ्रम कायम

By admin | Updated: February 15, 2015 00:12 IST

दर करारावरून अडकल्या शेतकरी अनुदानाच्या योजना दर करार की ई-निविदा? - संभ्रम कायम

  नाशिक : जिल्हा परिषदेत दर करार आणि ई-निविदा यांच्या अंमलबजावणीवरून पदाधिकारी व प्रशासन यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावल्याने काही महत्त्वाच्या साहित्य खरेदी लांबल्याचे चित्र आहे. यातही कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात द्यावयाच्या योजनाच या दरकरार आणि ई-निविदेच्या फेऱ्यात अडकल्याचे समजते. स्थायी समितीच्या सभेत शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी जिल्हा परिषदेत सोयी-सोयीने साहित्य खरेदी करताना शासन दरकरार व ई-निविदेची अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये दरकरार असूनही ई-निविदेची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी असा प्रकार समाजकल्याण विभागाच्या दोन कोटींच्या बेंच खरेदीबाबत झाला असून, तो विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आल्याचे सांगितले, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी दरकराराची मुदत संपल्याने ई-निविदा प्रकिया राबविण्यात आल्याचे सांगितले. ही बाब समाजकल्याण विभागाची असली तरी अन्य विभागातही दरकरारासाठी योजना रखडल्याचा आरोप प्रवीण जाधव यांनी केला. त्याबाबत लवकरच अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचे प्रवीण जाधव यांनी सांगितले. पुंडलिक बागुल यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू योजनेसह अन्य काही योजनांबाबत शासन स्तरावरून दर करार करण्यात येणार असून, त्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले, तर कृषी विभागाकडील ताडपत्री, प्लॅस्टिक क्रेटसह काही महत्त्वाच्या योजना ही केवळ दर करार न झाल्याने रखडल्याचे समजेत. मार्चअखेर या योजनांचा निधी खर्च न झाल्यास तो व्यपगत होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)