शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ई - स्क्रुटिनी पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयाने बारावीनंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी ...

नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयाने बारावीनंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि. १२ ) जाहीर केले असून, त्यानुसार मंगळवार (दि. १३) पासून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांना ४ ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. कोविड - १९चा प्रादुर्भाव व सामाजिक अंतर राखण्याची आवश्यकता विचारात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने ई - स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे यासाठी स्क्रुटिनी पद्धत निवडता येणार आहे.

दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाची वाट न पाहता, बारावीनंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी दोन पर्याय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुचविण्यात आले आहेत. यात विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून ई - स्क्रुटिनी पध्दतीचा पर्याय निवडू शकतील. या पध्दतीमध्ये उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून संगणक / स्मार्ट फोनद्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्रांवर (एफसीद्वारे) पडताळले जाणार आहेत. तसेच दुसऱ्या पर्यायात मोबाईल व संगणकावरून ऑनलाईन नोंदणी करून प्रत्यक्ष स्क्रुटिनी पध्दतीचा पर्याय विद्यार्थी निवडू शकतील. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन अथवा संगणकाची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळील सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी व सोयीस्कर वेळ ठरवण्यासाठी जावे. अशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी झालेले विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची तारीख व वेळ ठरवून घेतील. विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरणे, स्कॅन करून आवश्यक

कागदपत्रे अपलोड करणे आदी प्रक्रिया सुविधा केंद्रावर स्वतः नि:शुल्कपणे करू शकतील.

---

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

३१ जुलै ते ४ ऑगस्ट - ऑनलाईन नोंदणी करणे व कागदपत्र अपलोड करणे तसेच अर्जाची निश्चिती करणे

७ ऑगस्ट - तात्पुरती (प्रारुप) गुणवत्ता यादी जाहीर होणार

८ ते १० ऑगस्ट - तात्पुरत्या गुणवत्ता यादीविषयी हरकती व दुरुस्ती

१२ ऑगस्ट - अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार

---

अंतिम यादीनंतर पुढील वेळापत्रक

प्रत्यक्ष स्क्रुटिनी पध्दत निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात सूचना करण्यात आल्या आहेत. नियुक्त केलेल्या सुविधा केंद्रांवर सामाजिक अंतर राखणे तसेच त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार व पालकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. तसेच कॅपच्या विविध फेऱ्यांकरिता पर्याय निवडणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृती

करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थांमध्ये उपस्थित राहाणे, प्रवेशाची अंतिम तारीख आदींबाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाणार आहे.