नाशिक : बदलत्या परिस्थितीनुसार मनुष्याच्या जीवनशैलीत होणाऱ्या बदलांनुसार दैनंदिन जीवनातील चालीरीती, परंपरा, सण-उत्सवातील बाजारपेठ आणि उद्योग व्यवसायातही स्पष्टपणे बदल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आप्तेष्ट व्यक्तींना मौल्यवान वस्तू भेट देण्याच्या प्रथेतही बदल दिसून येत असून, आता अशा मौलिक वस्तूंची जागा विविध प्रकारच्या ई-गॅझेटने घेतली आहे.उद्योग व्यवसायातील बिलयंत्रणा आणि ताळेबंद संगणकीकृत होत असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर व्यवसायात नवीन संघणकीकृत यंत्रणा सुरू करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारच्या ई-गॅझेटला मागणी वाढली आहे. आधुनिक तंत्रानावर आधारीत उद्योग व्यवसायांमध्ये आणि वैयक्तीक नातेसंबधांमध्येही असाबदल झाला आहे. दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला विशेष वस्तू भेट देतो. या विशेष भेटवस्तूंमध्ये स्मार्टफोन, नोट, टॅबलेट अशा ई-गॅझेटचा अग्रक्रम असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. उद्योग व्यवसायात पारंपरिक पद्धतीने ताळेबंद तसेच उधारीचे खाते नोंदवहीत लिहिण्याची पारंपरिक पद्धत रूढ असताना वेगवेगळ्या उद्योगधंद्यातील व्यावसायिक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत ही यंत्रणा संगणकीकृत करण्याला प्राधान्य देत आहेत. अशा यंत्रणांमुळे व्यवहाराचे बिल तयार झाले की त्याची रोजनिशीत आणि ताळेबंदात स्वंयचलितरीत्या नोंद होण्याची तरतूद संगणक यंत्रणांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होतानाच व्यवहारातील सुटसुटीतपणा आणि नोंदी जतन करण्यास सोपे होते. शिवाय टचपॅड यंत्रणेमुळे सर्व पर्याय डोळ्यासमोर असल्याने केवळ स्पर्शाने बिल करणे शक्य होत असल्याने नवीन तंत्रज्ञानयुक्त विविध ई-गॅझेटचा वापर सोपा झाला आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये ई-गॅझेट अग्रस्थानी
By admin | Updated: October 23, 2016 00:13 IST