नाशिक : घरामध्ये झोपलेल्या अवस्थेत रात्रीच्या सुमारास एका चार वर्षीय बालिकेला विषारी साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.इंदिरानगर परिसरातील शिवकॉलनी भागात राहणाऱ्या पांगरे कुटुंबीयाची दिव्या सतीश पांगरे ही रात्री घरात झोपली असताना तिच्या उजव्या पायास विषारी सापाने दंश केल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी (दि.१७) सकाळी तत्काळ बालिकेला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अक स्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू
By admin | Updated: July 17, 2017 21:37 IST