शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस संशोधनासाठी ‘द्वारकाधीश’ दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:20 IST

द्वारकाधीश साखर कारखान्याने ऊस विकासामध्ये विविध योजना राबवून केलेला ऊस विकास अभिनंदनास पात्र आहे. कारखान्याचे व्यवस्थापन व स्वतंत्र ऊस कक्षाची कर्तव्यदक्षता विचारात घेऊन राज्यातून ऊस पीक संशोधन व विकासासाठी द्वारकाधीश साखर कारखाना आम्ही दत्तक घेत आहोत, असे मध्यवर्ती ऊस संशोधन संस्थेचे ऊस विशेषज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी जाहीर केले.

ताहाराबाद : द्वारकाधीश साखर कारखान्याने ऊस विकासामध्ये विविध योजना राबवून केलेला ऊस विकास अभिनंदनास पात्र आहे. कारखान्याचे व्यवस्थापन व स्वतंत्र ऊस कक्षाची कर्तव्यदक्षता विचारात घेऊन राज्यातून ऊस पीक संशोधन व विकासासाठी द्वारकाधीश साखर कारखाना आम्ही दत्तक घेत आहोत, असे मध्यवर्ती ऊस संशोधन संस्थेचे ऊस विशेषज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी जाहीर केले.भारतीय शुगर पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील ‘भारतीय शुगर आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार’ हा सन्मान कार्यकारी संचालक सचिन सावंत यांना मिळाला. त्याप्रीत्यर्थ द्वारकाधीश साखर कारखान्यावर ऊस उत्पादक मेळावा व ऊस विकास परिषद झाली, त्याप्रसंगी सोळंके बोलत होते. सोळंके व डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे दोन हजार ऊस उत्पादकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सोळंके यांनी रोपमळा निर्मिती, कीड नियंत्रण, पाण्याचे नियोजन, उसाच्या वेगवेगळ्या विभागनिहाय व कालनिहाय लागण व संगोपन याविषयी यथोचित मार्गदर्शन केले. स्वत: कारखाना प्रक्षेत्रातील ऊस पीक पाहणी करून कामकाज व कर्तव्यदक्षतेबाबत समाधान व्यक्त करून द्वारकाधीश साखर कारखाना ऊस विकासासाठी समर्थ आहे म्हणून आमची संस्था कारखान्यास दत्तक घेत आहे. कार्यक्र माचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी केले. दिवसेंदिवस शेतीच्या विभाजनामुळे शेतीचे छोटे-छोटे तुकडे झाले.निसर्गकोपाने ऊस क्षेत्रात वाढ होत नाही यासाठी पर्याय म्हणून उसाचे एकरी उत्पादन वढविणे हा एकच मूलमंत्र उत्पादकांनी अंगीकारावा, असे उत्पादकांना आवाहन केले. उत्पादकांनी गट शेती संकल्पना राबवावी, त्यासाठीचा सर्व खर्च कारखाना देईल व गळीतास आलेल्या उसामधून बिनाव्याजी वसूल केला जाईल. याप्रसंगी सचिन सावंत यांचा विविध संस्था व मान्यवरांनी सत्कार केला.