शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:10 IST

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला असून, बाजारभाव पडताळणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही या डस्टबिन घोटाळ्यासंदर्भात प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देडस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवालमहापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला असून, बाजारभाव पडताळणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही या डस्टबिन घोटाळ्यासंदर्भात प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.पुढील महिन्यात शहरात केंद्र सरकारच्या पथकामार्फत स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील बाजारपेठ परिसरात ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. मात्र, महापालिकेने अशा डस्टबिन बसवत पुन्हा कचराकुंडीयुक्त शहर निर्माण करण्याचा घाट घातल्याचा आणि या डस्टबिन खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता. सदर डस्टबिन या बाजारात सुमारे दोन ते अडीच हजारात उपलब्ध होत असताना त्यासाठी महापालिकेने ११ हजार १२१ रुपये मोजल्याचेही बोरस्ते यांनी निदर्शनास आणून दिले होते आणि या साºया घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी ‘लोकमत’शी बोलताना डस्टबिन खरेदीसंदर्भात झालेल्या आरोप प्रकरणी आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात येत असून, बाजारपेठेतील दर आणि प्रत्यक्ष निविदेतील दर याची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, महापौर रंजना भानसी यांनीही या डस्टबिन खरेदीबाबत शंका उपस्थित करत या साºया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले आहे. वास्तविक, डस्टबिन खरेदीचा विषय हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो महासभेवर मान्यतेसाठी येणे आवश्यक होते. तो का आला नाही, याची माहिती घेण्यात येईल, असेही महापौरांनीस्पष्ट केले. धोरणात्मक बाब नाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डस्टबिन खरेदी अथवा कचराकुंड्या लावण्याबाबतचा विषय हा धोरणात्मक असल्याने त्याचा प्रस्ताव महासभेवर का मांडण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता तर महापौर रंजना भानसी यांनीही विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिसळवित सदर बाब धोरणात्मक असताना महासभेवर विषय आणण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्याबाबत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच काम सुरू असून डस्टबिन बसविण्याचा निर्णय धोरणात्मक बाब ठरत नाही. त्यामुळे महासभेत तो मांडण्याचा प्रश्नच नाही. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सदर निर्णय घेण्यात आलेला असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.